Hingoli Mla Santosh Bangar News
Hingoli Mla Santosh Bangar News Sarkarnama
मराठवाडा

Hingoli News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगरांचा ताफा वेशीवरच अडवला..

संदीप नागरे

Marathwada Politics : वर्षानुवर्ष गावात भरत असलेली जत्रा ही सर्वधर्मीयांसाठी आहे, इथे राजकारणाला थारा नाही, असे म्हणत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Mla Santosh Bangar) यांचा ताफा गावाच्या वेशीवरच अडवला. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर गावकऱ्यांनी मध्यस्थी करत बांगर यांना दर्शनासाठी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला.

राज्यातील सत्तांतरानंतर ठिकठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये राडा होतांना पहायला मिळतो. असा राडा आज (Hingoli) हिंगोली जिल्ह्यातील एका यात्रेत होणार होता, परंतु गावकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई गावात दरवर्षी यात्रा भरत असते. यंदा या यात्रेत गावातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर (Mla Santosh Bangar) यांना आमंत्रित केले होते.

शेकडो वर्षांपासून ही यात्रा भरते पण इथे राजकारण्यांना प्रवेश दिला जात नाही. मात्र यावर्षी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आमदार संतोष बांगर यांना यात्रेचे निमंत्रण देत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहावे असा आग्रह धरला होता. याची कुणकुण लागताच ठाकरे गटाने याला कडाडून विरोध दर्शवला. आमदार संतोष बांगर यांच्या गाड्यांचा ताफा जेव्हा वेशीतून गावात प्रवेश करणार होता, तेव्हा वेशीवरच ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना गावात येण्यास मज्जाव करू लागले.

त्यामुळे बांगर यांच्यासोबत आलेले आणि गावातील त्यांचे समर्थक चिडले आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराचवेळ हा गोंधळ सुरू होता. आमच्या गावातली यात्रा ही सर्व धर्मीय आहे, इथे राजकारण करू नका म्हणत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी बांगर यांना यात्रेत जाण्यापासून रोखले. वाद वाढून मोठा राडा होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. त्यानंतर बांगर यांना दर्शनासाठी गावात सोडण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT