Abdul Sattar News : ना चौकशी, ना कारवाई, सत्तार सिल्लोडमध्ये दरवर्षी घेणार कृषी महोत्सव..

Marathwada : हिवाळी अधिवेशनात मंत्रीपद सलामत राहिल्यामुळे सत्तार अधिक आक्रमकपणे विरोधकांना उत्तर देत आहेत.
Mla Abdul Sattar News, Aurangabad
Mla Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Aurangabad : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड मतदारसंघात राज्यस्तरीय कृषी महोत्सव भरवला. १ ते ५ जानेवारी दरम्यान, राज्यातील चार विद्यापीठातील संशोधकांचे परिसंवाद आणि १२ लाख शेतकऱ्यांनी महोत्सवाला हजेरी लावल्याचा दावा सत्तारांनी केला आहे. राज्यस्तरीय महोत्सव (Agricultuer Festival) पहिल्यादांच मराठवाडा आणि तोही सिल्लोड सारख्या शहरात भरवल्यामुळे सुरूवातीला सत्तारांचे कौतुक झाले. पण या महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांच्या महावसुलीचे टार्गेट कृषी विभागाला दिल्याच्या आरोपामुळे या चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले.

Mla Abdul Sattar News, Aurangabad
Teachers Constituency : नवख्या किरण पाटलांचा अनुभवी विक्रम काळेंशी सामना ...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थितीत करत सत्तारांच्या (Abdul Sattar) राजीनाम्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल आणि वसुलीसाठी टार्गेट दिल्याचे स्पष्ट झाले तर संबंधितांवर कारवाई करू, असे देखील सांगितले. (Marathwada) गायरान जमीन वाटप आणि महोत्सवासाठीच्या महावसुलीच्या आरोपांमुळे सत्तारांचे मंत्रीपद जाणार असे वाटत होते, पण शिंदे-फडणवीस जोडीने या संकटातून सत्तारांना सुखरूप बाहेर काढले.

कृषी महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या आरोपांची ना चौकशी झाली, ना कोणावर कारवाई? त्यामुळे ५ जानेवारी रोजी जेव्हा या कृषी महोत्सवाचा समारोप उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला, तेव्हा सत्तार यांनी यापुढे आपण दरवर्षी सिल्लोडमध्ये कृषी महोत्सव भरवणार अशी घोषणा केली. सत्तार यांची घोषणा म्हणजे विरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार होता.

हिवाळी अधिवेशनात मंत्रीपद सलामत राहिल्यामुळे सत्तार अधिक आक्रमकपणे विरोधकांना उत्तर देत आहेत. अजित पवार, अंबादास दानवे यांनी अधिवेशन काळात दोन्ही सभागृहात सत्तारांना लक्ष्य केले होते. सभागृहात आणि बाहेर रान पेटवून देखील सत्तारांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात विरोधकांना यश आले नाही.

त्यामुळे सत्तारांचे मनोबल वाढले आहे, त्यातूनच त्यांनी दरवर्षी सिल्लोडमध्ये कृषी महोत्सव घेण्याची घोषणा करून टाकली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने सत्तार विरोधकांना आता जुमानायला तयार नाहीत, हेच यावरून सिध्द होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com