हिंगोली : शिवसेनेत कोण आले, कोण गेले याची आता पर्वा नाही. तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना दिला. लवकरच तुमच्या भेटीला येईन, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. आज मंगळवारी (ता.५) रोजी उद्धव ठाकरे यांनी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शिवसैनिकांशी फोनद्वारे संपर्क साधला.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी काल विश्वादर्शक ठरावाच्या वेळी अचनाक भूमिका बदलली आणि शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यांनतर हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. काही दिवसांपुर्वीच बांगर यांनी एकनिष्ठ म्हणून मोठा सत्कार केला होता. त्यांनीही डोळ्या अश्रू आणत खांद्यावरचा भगवा कधी खाली उतरू देणार नाही, शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
पण काही तासांतच त्यांनी आपला निर्णय फिरवला. बांगर यांच्या बंडामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्याशी संवाद साधला. येथील शासकिय विश्रामगृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव , पदाधिकारी डॉ. रमेश शिंदे , परमेश्वर मांडगे, दिलीप बांगर, राजू चापके, संदेश देशमुख , अँड. रवी शिंदे, उध्दव गायकवाड अंकुश आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या बैठकीत संवाद साधला.
ते म्हणाले , ज्या लोकांना आपण सर्वकाही दिले ते सोडून गेले. मात्र , ज्यांनी आपल्याला दिले ते मात्र सोबत राहिले आहेत. आता मला कशाचीही चिंता नाही, तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार. त्यासाठी जिल्हा कार्यकारणीची बैठक मुंबई येथे बोलावण्यात आली आहे. त्यानंतर मी हिंगोलीत येणार असून तुमची सर्वांची भेट घेणार आहे.
आता पुन्हा उभा राहिलो असून कुठल्याही परिस्थितीत लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . यावेळी उपस्थितांनी हिंगोली जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांना दिली. शिवसेना बळकट करणार असून पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हा प्रमुखांची निवड होणार असल्याचे आनंद जाधव यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.