Aurangabad : पन्नास कोटी घेणारे नाही, तर देण्याची ताकद असलेले आमदार आमच्यासोबत..

माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी लोकांना सांगितल्या गेल्या, त्यावर जनतेनी विश्वास ठेवला नाही हे आज माझ्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीने दाखवून दिले आहे. (Mla Ramesh Bornare)
Chandrakant Khaire-Mla Ramesh Bornare
Chandrakant Khaire-Mla Ramesh BornareSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : विधानसभेत विश्वादर्शक ठराव संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलेल्या तडाखेबाज भाषणाची चर्चा संपुर्ण राज्यात होत आहे. शिंदे यांनी एक तासाच्या भाषणाने शिवसैनिकांची मने जिंकल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. विश्वादर्शक ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार आपापल्या मतदारसंघात परतत आहेत. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Mla Ramesh Bornare) आज मतदारसंघात आले तेव्हा त्यांचे समर्थकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आम्ही बंड नाही तर उठाव केल्याचे सांगतांनाच आपल्यावर ५० कोटी घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना देखील त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

५० कोटी घेणारे नाही तर, देण्याची ताकद असलेले आमदार आमच्या सोबत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर (Aurangabad) औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार त्यांच्यासोबत गेले होते. या सर्व बंडखोरांच्या विरोधात जिल्ह्यातील नेत्यांनी आरोप, निदर्शने, बैठका घेऊन त्यांना गद्दार ठरवले. त्यानंतर तब्बल १५ दिवसांनी मतदारसंघात परतलेल्या आमदार बोरनारे यांचे स्वागत कसे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Marathwada) पण त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत बोरनारे यांचे वाजत-गाजत स्वागत केले. या स्वागताने बोरनारे भारावले होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना बोरनारे म्हणाले, आम्हाला गद्दार, विकले गेलेले, पैसे घेणारे असे आरोप आमच्यावर केले गेले. पण आम्ही बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे काम आणि त्यांची एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण झाले आहे. वैजापूर तालुक्यातील पाच महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी शिंदे यांच्यासोबत गेलो होतो.

Chandrakant Khaire-Mla Ramesh Bornare
पक्ष सोडणाऱ्यांना खुलासेच द्यावे लागतात : राऊतांनी डिवचले

मतदारसंघात मी विकास कामे केली नाही, तर येणाऱ्या २०२४ मध्ये मतदार मला त्याची शिक्षा देतील. पण माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी लोकांना सांगितल्या गेल्या, त्यावर जनतेनी विश्वास ठेवला नाही हे आज माझ्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीने दाखवून दिले आहे. उरलेल्या अडीच वर्षात तालुक्याचा सर्वांगीण विकास करून आत्मविश्वासाने मी २०२४ च्या निवडणुकीला समोर जाईन, असा विश्वास देखील बोरनारे यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ५० कोटी घेतल्याच्या आरोपावर आम्ही ५० कोटी घेणारे नाही, तर देण्याची ताकद असलेले आमदार आहोत. या सगळ्या आरोपांना मी सरलाबेट येथे उत्तर देणार असल्याचेही बोरनारे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com