Imtiaz Jalil On Vikhe Meeting News
Imtiaz Jalil On Vikhe Meeting News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil On Vikhe Meeting : मंत्री भाजप कार्यकर्त्यांची बैठकी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत कशी घेवू शकतात ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज शहरात आहेत. विविध शासकीय बैठका आणि त्याच सोबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद असा त्याचा शासकीय दौरा कालच आला. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अधिकाऱ्यांच्या बैठकीसोबत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांची देखील बैठक बोलावल्याचे या अधिकृत दौऱ्यात नमूद केले आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नेमकं यावर बोट ठेवत महसुल मंत्री विखे पाटील, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात, प्रशासकी अधिकाऱ्यांसोबत (Bjp)भाजपचे मंत्री त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक कशी काय घेवू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे. या संदर्भात ट्विट करत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.

सत्तेचा गैरवापर, पक्षाच्या बैठका, मेळाव्याला यायचं असेल तर एखादी आढावा बैठक घेवून तो दौरा अधिकृत दाखवणे असे प्रकार नवे नाहीत. (Aimim) अनेकदा मंत्री अशा प्रकारचे शासकीय दौरे आणि त्याद्वारे पक्षाच्या बैठका, मेळाव्यांना हजेरी लावत असतात. यापुर्वी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात पर्यटनस्थळांच्या भेटीवर इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला होता.

त्यानंतर आता महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आजचा दौरा देखील वादात सापडला आहे. विखे यांच्या अधिकृत दौऱ्यांच्या माहितीमध्ये इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाती नियोजन भवनात आयोजित बैठक आणि त्या दरम्यान तिथेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर आक्षेप नोंदवला आहे. विखे यांच्या अधिकृत दौऱ्यात दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोनज भवनात शासकीय अधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याच दौऱ्याच्या पत्रात एका भाजप पदाधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक नावासह नमूद करण्यात आला आहे. कुठल्याही शासकीय बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्माचाऱ्यांशिवाय बाहेरच्या व्यक्तला प्रवेश दिला जात नाही. मग इथे तर थेट अधिकाऱ्यांच्या बैठकीतच मंत्र्यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलावले आहे. यावर आक्षेप घेत भाजपचे मंत्री असे कसे करू शकतात? असा संतप्त सवाल इम्तियाज यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थितीत केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT