Aurangabad High Court News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad High Court: घरात हनुमान चालिसा म्हटल्याने भावना कशा दुखावतील ? गुन्हा रद्द..

Hanuman Chalisa News: मशिदीत आजानच्या वेळेत हनुमान चालिसा वाजविल्याचा आरोप.

Jagdish Pansare

Aurangabad News : एखाद्या व्यक्तीने स्वत:च्या घरात धार्मिक प्रार्थना केली, तर त्यामुळे इतरांच्या भावना दुखावण्याचे काही कारण नाही. रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षक किशोर मलकूनाईक यांनी आपल्या घरात हनुमान चालिसा वाजविल्याने त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. जी. अवचट आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले.

संबंधित प्रकरणात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे सिद्ध होत नसल्याचेही खंडपीठाने (High Court) स्पष्ट केले. (Fir) रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने २३ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी घरातील स्पिकरवर हनुमान चालीसा लावली होती.

मशिदीत आजानच्या वेळेत हनुमान चालिसा वाजविल्याचा आरोप करुन केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ५०५ (१) (ब), ५०५ (क), ३४ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Aurangabad) हा संबंधित गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी अॅड. अमरजितसिंह गिरासे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

मलकूनाईक यांनी शातंतेचा भंग केला, दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी कृती केली. इतरांच्या भावना दुखावतील असे कृत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. एखादी व्यक्ती आपल्या घरात धार्मिक प्रार्थना करत असेल तर त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावतील? अशा प्रश्न खंडपीठाने उपास्थित केला. घरात प्रार्थना करण्याने दोन समाजात तेढ निर्माण होत नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने मलकूनाईक यांच्या विरोधातील दाखल गुन्हा रद्द केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT