Shivsena UBT News : मराठा आरक्षणासंदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीसाठी ज्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही, अशा पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. पण शिवसेनेला डावलण्याचा कोतेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve News) यांनी केला. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की राजकारण करायचे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला.
मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलतांना दानवे यांनी सरकारवर टीका केली. (Shivsena) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चेसाठी साठ संघटनांना बोलावले होते. (Maratha Reservation) आज महत्वाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत शिवसेनेला मात्र डावलले. तुम्हाला टीका करायला, आरोप करायला शिवसेना लागते, मग बैठकीला का बोलावले नाही?
विरोधी पक्षनेता म्हणून मला आमंत्रण असले तरी शिवसेना म्हणून पक्षाला न बोलवण्याचा कोतेपणा या सरकारने केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत जी-२० परिषदेला जातात, दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तर सभा, दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण चौदा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाला आणि आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतांनाच ओबीसी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्याबाबतही सरकारने तातडी निर्णय घेतला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर त्याबद्दल शुभेच्छा, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असेही दानवे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.