Abdul Sattar-Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

मी तालुक्यात शेरच; पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर लोकसभेला विरोधात लढणारच..

दानवेनी एवढा अंहकार करू नये, दर पाच वर्षांनी आपल्याला जनतेसमोर नतमस्तक व्हावंच लागंत. (Abdul sattar)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गली मे तो हर कोई शेर होता है, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना डिवचले. (Shivsena)एवढेच नाहीतर हिमंत असेल तर लोकसभेला माझ्या विरोधात लढून दाखवा, असे आव्हान देखील दिले होते.

दानवे यांचे आव्हान अब्दुल सत्तार यांनी स्वीकारले असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली तर तुमची ही इच्छा देखील पुर्ण करील. अन्य कुणाला उमेदवारी दिली तर त्यालाही निवडून आणू, असा इशारा सत्तार यांनी दानवेंना (Raosaheb Danve) दिला आहे.

सोयगांव नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागला, सत्तार यांनी एकहाती सत्ता मिळवत भगवा फडकवला. तर भाजपला मात्र केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. परंतु या निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकारण आणि नेते देखील चांगलेच तापले आहेत. एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे.

अब्दुल सत्तार यांनी दोन केंद्रातले मंत्री येऊन देखील त्यांना भूईसपाट केले, असे विधान करत रावसाहेब दानवे यांच्या पराभवाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे म्हटले होते. यावर १५ मतांनी जिंकणाऱ्या सत्तारांनी मला आव्हान देण्याची भाषा करू नये, हिमंत असेल तर लोकसभा निवडणूक माझ्या विरोधात लढवून दाखवावी.

गली मे तो.. हर कोई शेर होता है, असा टोला देखील सत्तार यांना लगावला होता. याला देखील सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, हो मी माझ्या तालुक्यातला शेरच आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर आदेश दिला तर लोकसभेला दानवेंची ही इच्छा देखील पुर्ण करण्याची माझी तयारी आहे.

एवढेच नाही तर माझ्याशिवाय पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल, त्याला देखील निवडून आणल्याशिवाय मी राहणार नाही.दानवेनी एवढा अंहकार करू नये, दर पाच वर्षांनी आपल्याला जनतेसमोर नतमस्तक व्हावंच लागंत. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून देवू, असेही सत्तार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT