पटोले आले तर त्यांना कपडे फाटेपर्यंत मारू; भाजप शहराध्यक्षाचा इशारा

येत्या पंधरा दिवसांत नाना पटोलेंनी औरंगाबादेत येवून दाखवावे, भाजपचे कार्यकर्ते त्यांना कपडे फाटेपर्यंत मारल्याशिवाय राहणार नाही. ( Bjp Aurangabad)
Nana Patole-Sanjay Kenekar
Nana Patole-Sanjay KenekarSarkarnama

औरंगाबाद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सातत्याने अवमान करणारी विधानं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) करत आहेत. ते यातून फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचाच नाही तर देशातील १३५ कोटी जनतेचा आणि त्यांच्या स्वाभीमानाचा अपमान करत आहेत. त्यामुळे ते औरंगाबादेत (Aurangabad) आले तर त्यांना कपडे फाटेपर्यंत मारू, असा दम भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी दिला आहे.

` ज्याची बायको पळून जाते ते मोदी ठरतातं`, अस वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी नुकतेच काढले आणि राज्यभरात त्यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली. मोदींना मी मारू शकतो, शिव्या देऊ शकतो या विधानवरून उठलेले वादळ शमले नाही, तोच नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका करत भाजपला अंगावर घेतले.

ज्याची बायको पळून जाते तो मोदी ठरतो या त्यांच्या नव्या विधानमुळे भाजप चांगलीच खवळली आहे. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नाना पटोले यांचे पुतळे तुडवत आहेत, जाळत आहे. औरंगाबादेत भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात क्रांतीचौकात निदर्शने करण्यात आली.

नाना पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारत तो जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. पोलीसांनी सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी संजय केणेकर यांनी नाना पटोले यांना शहरात येवूनच दाखवा असे आव्हान दिले. केणेकर म्हणाले, नाना पटोले यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे त्यांच्या विधानावरून दिसून येते.

Nana Patole-Sanjay Kenekar
माझ्या मागे लाखो कार्यकर्त्यांची फौज, मी सत्तारच्या जीवावर निवडून येत नाही..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त, अवमान करणारे विधान करून ते संवग लोकप्रियता मिळवू पाहत आहेत. पण हे करत असतांना आपण मोदींचाच नाही तर देशातील कोट्यावधी जनतेचा व त्यांच्या स्वाभीमानाचा देखील अपमान करत आहात.

त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत नाना पटोलेंनी औरंगाबादेत येवून दाखवावे, भाजपचे कार्यकर्ते त्यांना कपडे फाटेपर्यंत मारल्याशिवाय राहणार नाही, हा माझा त्यांना इशारा असल्याचे केणेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com