Mla Bangar- MP Patil News Sarkarnama
मराठवाडा

MLA Santosh Bangar On Thackeray : उद्धव ठाकरेंकडे दहा वेळा गेलो; पण हळद संशोधन केंद्र एकनाथ शिंदेंनीच केले...

Marathwada Political News : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळाता मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीच मिळत नव्हता.

Prasad Shivaji Joshi

Hingoli Political News : हिंगोली येथील हळद संशोधन केंद्र मंजुर करण्यासाठी खासदार हेमंत पाटील व मी दहा दहा वेळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जात होतो मात्र तरीही काम होत नव्हते. (Shivsena News) राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार आले आणि हळद संशोधन केंद्र तात्काळ मंजुर झाले, असा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला.

खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी हिंगोली जिल्ह्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली होती. ती मदत प्रत्यक्ष आज भास्कर पेरे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आली. (Santosh Bangar) आमदार संतोष बांगर यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्यातील विविध विकासकामाना मंजूरी देऊन लाखोंचा निधी दिला आहे.

जिल्ह्यातील अनेक नेते याचे श्रेय घेत आहेत. मात्र या विकासकामांचे खरे श्रेय हेमंत पाटील यांचे आहे. (Hingoli) याच कामाच्या मंजुरीसाठी हेमंत पाटील व मी दहा दहा वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडे जात होतो मात्र तरीही काम होत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी अतिशय तात्काळ मंजुरी दिल्याचे बांगर यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळाता मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीच मिळत नव्हता, फायलींवर सही करायला त्यांचा हातच चालत नव्हता, असे आरोप शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांनी वारंवार केले. आता हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्राचे श्रेय मुख्यमंत्री एकनथा शिंदे यांना देतांनाच ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणे ही गावाच्या विकासासाठी खूप चांगली बाब आहे.

यामुळे गावातील भांडण तंटे कमी होऊन गावाचा विकास होतो, असे मत आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतला निधी देण्याचा खासदार हेमंत पाटील यांचा उपक्रम अतिशय अभिनंदनास्पद आहे. प्रत्येक सरपंचानी आपल्या गावात स्वच्छ पाणी द्यावे, भरपूर झाडे लावावीत, मुलांना चांगले शिक्षण द्यावे, गावात स्वच्छता असावी, असा कानमंत्र पेरे पाटील यांनी उपस्थीत सरपंचाना दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT