Dhananjay Deshmukh& Viral Photo Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh : ...तर न्यायाधीशांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत होळी खेळण्याची हिम्मत केली नसती; होळीच्या त्या फोटोवर धनंजय देशमुखांची नाराजी

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसोबत हा खटला ज्यांच्यासमोर सुरू आहे, त्या न्यायाधीशांनी शुक्रवारी होळी खेळल्याचे फोटो अंजली दमानिया यांनी व्हायरल केले होते.

Vijaykumar Dudhale

Beed, 15 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत हा खटला ज्यांच्यासमोर सुरू आहे, त्या न्यायाधीशांनी शुक्रवारी (ता. 14 मार्च) होळी खेळल्याचे फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियातून व्हायरल केले होते. त्याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दुःख व्यक्त करताना ‘माझ्या भावाच्या पाठीवरील काळेनिळे डाग पाहिले असते तर अंगावर कोणताही कलर घेण्याची हिम्मत झाली नसती,’ अशी भावना व्यक्त केली.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून खटल्यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारी आहे. या प्रकरणाची सुनावणी बीडमध्ये सुरू आहे. ज्या न्यायाधीशांसमोर हे प्रकरण चालविले जाणार आहे, ते न्यायाधीश हे निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसोबत होळी खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याबद्दल धनंजय देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) म्हणाले, संतोष देशमुख खूनप्रकरणातील आरोपींसोबत जे पोलिस अधिकारी होते, तसेच ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी संबंधित पीआयने ते आरोपी कुठे आहेत, हे सांगितलं पाहिजं होतं. त्यामुळे संतोष देशमुख यांना वाचविण्याची संधी आपल्याला मिळू शकली असती. या प्रकरणातील निलंबित पोलिस अधिकारी आणि हे प्रकरण ज्या न्यायाधीशांसमोर सुरू आहे, त्यांचे होळी खेळतानाचे फोटो पाहून मला माणूस म्हणून एक प्रश्न पडला.

ज्या आरोपींनी माझ्या भावाला हाल हाल करून मारले, जे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातील घरीघरी पोचले आहे. संतोष देशमुख यांच्या पाठीवर जे वळ उमटले होते. रक्त साकाळलं होते, त्यांचं अंग काळंनिळं झालं होतं. ते बघितले असते तर कालचे कलर अंगावर घेण्याची हिम्मत त्यांनी केली नसती. पण, हे दुःख त्यांनी मनावर घेतलं नसावं; म्हणून त्यांनी एवढी हिम्मत केली, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

ज्या आरोपींचा रोख आपल्याकडे येतो, ज्या आरोपींसोबत आपण वावरतो. त्या लोकांना कलर खेळताना माझ्या भावाच्या पाठीची, त्याच्या शरीरावरील घाव आणि काळेनिळे डाग याची आठवण होणे गरजेचे असताना त्यांनी काल जे केलं, त्यामुळे मला त्या गोष्टींचा त्रास झाला. माणसं असं कसं करू शकतात, असा प्रश्न मला पडला, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT