Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलिस, सुनावणी घेणारे न्यायाधीशांची एकत्रित 'धुळवड'? दमानियांने फोटो केले शेअर

Anjali Damania Shares Photo Judge Suspended Cops Celebrate Holi Together : दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case sarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलिस अधिकारी आणि सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा धुळवडचा एकत्रित आनंद घेत असल्याचा फोटो सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये निलंबित पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवडीचा आनंद घेताना दिसत आहेत.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलिस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुरवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेतपण कोणाबरोबर ? संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिस सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.'

Santosh Deshmukh Case
Raosaheb Danve : 'कलरफुल' रावसाहेब दानवेंची धुळवड; ठाकरे, गांधी अन् राऊतांसह विरोधकांचा रंग दाखवत काढला चिमटा

दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, 'आरोपीला वाचणारे हे निलंबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.'

संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना तपासात दिरंगाई केल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले, तर उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपींच्या मदतीच्या संशयावरून अनेक वेळा चर्चा झाली आहे. त्यामुळे न्यायाधीश आणि या अधिकाऱ्यांचा एकत्र फोटो समोर आल्यानंतर मोठी चर्चा रंगली आहे. या फोटोची अधिकृतरित्या सत्यता अजून समोर आलेली नाही. मात्र, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Santosh Deshmukh Case
Hemant Rasane : 'जनतेच्या मनातील आमदार रवींद्र धंगेकर', कट्टर विरोधक आमदार हेमंत रासनेंनी एका वाक्यात विषय संपवला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com