MLA Amit Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh On Cabinet Meeting : मराठवाड्याला काही द्यायचेच नव्हते, तर मग बैठक घेतली कशाला ? अमित देशमुख भडकले..

Jagdish Pansare

Latur Political News : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून या विभागाची निराशाच झाली आहे. (Cabinet Meeting News) शासनाने जुन्या योजनाच नव्याने जाहीर करून येथील जनतेची दिशाभूल केली आहे.

या विभागात लातूर (Latur News) जिल्हा आहे याचा तर सरकारला विसरच पडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया माजी वैद्यकीय मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिली. मराठवाड्याला काही विशेष द्यायचेच नव्हते, तर मग मंत्रीमंडळाची बैठक घेतली कशाला? असा सवालही देशमुख यांनी केला.

बऱ्याच अवकाशानंतर मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी, शिक्षण, औद्योगिकीकरण, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य (Congress) या विभागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन येथील अनुशेष दूर होईल ही अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.

सततच्या दुष्काळामुळे लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राबरोबरच औद्योगिक प्रगती थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात पाणी आणण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते मात्र मराठवाडा वॉटरग्रीडचा चेंडू पुन्हा केंद्राकडे ढकलून राज्य शासनाने हात झटकले आहेत.

लातूरच्या शैक्षणिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक व पूरक सुविधांची उभारणी, लातूर शहराचा बाह्य वळण रस्ता, एमआयडीसीचा तिसऱ्या टप्प्यातील विस्तार, अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत यासंबंधीच्य घोषणा मंत्रिमंडळ बैठकीनंतर केल्या जातील, असे वाटत होते. मात्र राज्य सरकारने फक्त मराठवाड्यात येऊन बैठक घेण्याचे सोपस्कार पूर्ण केले आहेत, असा आरोपही देशमुख यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT