Ashok Chavan News, Maharashtra
Ashok Chavan News, Maharashtra Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan On Samruddhi Mahamarg: नांदेड-जालना द्रुतगती महामार्गात बदल केल्यास काम बंद पाडू ; अशोक चव्हाण संतापले..

सरकारनामा ब्युरो

Nanded : मराठवाड्यातील जालना-नांदेड-परभणी-हिंगोली हे जिल्हे देखील समृद्धी महामार्गाला जोडले जावेत, अशी आग्रही मागणी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांनतर महाविकास आघाडी सरकारने ती मान्य करत त्यासाठी निधीची तरतूद देखील केली.

त्यानंतर राज्यात सत्तातंर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यांनी देखील महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) तो निर्णय कायम ठेवत, निधी वितरित करण्याची तयारी दर्शवली. अशोक चव्हाण यांनी याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभारही मानले होते. परंतु आता समृद्धीला जोडणाऱ्या (Nanded) नांदेड-जालना या द्रुतगती महामार्गांच्या मुळ आराखड्यात बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हा संपुर्ण महामार्ग सिमेंट काॅंक्रीटचा करण्याचे ठरले होते. परंतु आता नव्या बदलानुसार तो डांबरी केला जाणार आहे. याची माहिती कळताच अशोक चव्हाण (Ashok Chavan) संतापले. त्यांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नाही, तर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड- जालना द्रुतगती महामार्गाच्या मूळ मंजुरीत कोणताही बदल न करता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचाच झाला पाहिजे.

मराठवाड्यावर असा अन्याय होत राहिला तर रस्त्याचे काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड या द्रुतगती महामार्गास सप्टेंबर २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. या संर्भात शासन निर्णय देखील तेव्हा जारी करण्यात आला होता. या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT