Shivsena : शिवसनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपुर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना उद्देश ` राऊतांचा भोंगा बंद करतो, मुंबईतील बाळासाहेब भवनात धमाका करतो असा दावा केला होता. (Sanjay Shirsat On Patra Chawal) त्यामुळे शिरसाट नेमका कोणता धमाका करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. शिरसाट यांनी पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
संजय शिरसाट यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्राचाळ प्रकरणात राजकीय पुढारी, बिल्डर, उद्योजक आणि आणखी काही मोठ्या लोकांचा हात असल्याचा आरोप केला. (Shivsena) तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करावी, सहा महिन्यात पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात माहिती देतांना (Sanjay Shirsat) संजय शिरसाट म्हणाले, गोरेगांव येथील पत्राचाळ जमीनीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. येथील रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही, किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे भाडे संबंधितांकडून दिले गेले नाही. या प्रकरणात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असून राजकीय पुढारी, शासकीय अधिकारी, बिल्डरांसह अनेकांचा यात हात आहे.
या संदर्भातील कागदोपत्री पुरावे, नावासह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. तसेच या संपुर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायमुर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या चौकशीसाठी समिती स्थापन करून सहा महिन्याच्या आत अहवाल मागवला जाईल. त्यानंतर दोषीवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
पत्राचाळ प्रकरणात अनेक नवी नावे समोर आली आहेत, पण निवृत्त न्यायमुर्तींमार्फत चौकशीची मागणी केल्यामुळे मी ती जाहीर करू शकत नाही. चौकशी अहवाल जेव्हा प्राप्त होईल तेव्हा सत्य जनतेसमोर निश्चित येईल. जे पुढारी, शासकीय अधिकारी, बिल्डर, उद्योजक या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जावेत, यासाठी देखील मी आग्रही असणार आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.