Raosaheb Danve On Nehru News
Raosaheb Danve On Nehru News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve On Nehru News : नेहरूंनी इथेनॉल निर्मितीला चालना दिली असती, तर देश उर्जा क्षेत्रात स्वंयपूर्ण झाला असता..

राम काळगे

Nilanga : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंना (Pandit Jawaharlal Nehru) इथेनाॅलचे महत्त्व माहीत असतानाही त्यांनी त्याला चालना दिली नाही. जर त्याकाळी योग्य निर्णय घेऊन चालना दिली असती तर उर्जा क्षेत्रामध्ये देश स्वंयपूर्ण झाला असता, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स.सा.का. लि.ओंकार साखर कारखाना प्रा.लि. युनिट - 2 येथे इथेनाॅल व डिस्टलरी प्रकल्प, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचे भुमिपूजन आज दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना त्यांनी मांजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यावर टीका केली. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा नेहरूंवर टीका करायचे, मात्र रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील थेट नेहरूंवर हल्ला चढवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Latur) दानवे म्हणाले की, माजी पंतप्रधान वाजपेयींच्या काळात ५ टक्के इथेनाॅल वापराची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासूनच इथेनाॅल निर्मितीला गती मिळाली.

पुढे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाच टक्यांची मर्यादा वाढवून २० टक्के केली. त्यामुळे इथेनाॅल नर्मिती आणि त्यातून उर्जा निमिर्तीचे प्रमाण अधिक वाढले. हे जर नेहरूंच्या काळात त्यांनी केले असते, तर आज आपण उर्जेच्या बाबतीत स्वयंपुर्ण असतो. केवळ साखर निर्मिती करून साखर उद्योग कधीही नफ्यात येत नाही, त्यासाठी सहउद्योग उभा करणे गरजेचे आहे.

त्या दृष्टीने शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्यात इथेनाॅल निर्मिती प्रकल्प उभा केल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या शेतीवीषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून सध्याच्या सरकारची धोरणं ही शेतीसाठी गुंतवणुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडणारी ठरेल.

गेल्या बारा वर्षापासून शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना बंद होता. मात्र परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावी या हेतूने ओंकार शुगरने कारखाना चालवायला घेतला. केंद्र शासनाच्या धोरणामुळे आता पिक विम्याची रक्कम मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एक रूपया विमा शेतकऱ्यांनी भरायचा व उर्वरीत रक्कम राज्य शासनाने भरायची हे फक्त भाजप सरकारच्या काळात होऊ शकते.

५० हजार रूपयावरून शेततळ्याची रक्कम आता ७५ हजार रूपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील दानवे यांनी केले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आता जागृत होण्याची गरज आहे. यासाठी शेतकरी मेळावे घ्यावे, फार्मर प्रोडूसर कंपन्याची स्थापना कराव्यात सरकार आपल्या पाठीशी आहे.

२०१४ पासून मोदी सरकारमुळे पिकविमा संरक्षण मिळत असल्याचेही ते म्हणाले. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, पाशा पटेल, शिवाजी पाटील कव्हेकर, धर्माजी सोनकवडे, टी. पी. कांबळे, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT