Let. Shivajirao Nilangekar-Mla Sambhaji Patil Nilangekar News
Let. Shivajirao Nilangekar-Mla Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

स्व. निलंगेकरांनी खंडपीठ मिळवून दिले नसते, तर मुंबईत खूप संघर्ष करावा लागला असता..

राम काळगे

लातूर : आज पासून बरोबर १२ वर्षापूर्वी लातूर जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षात पक्षाचा व्हीप डावलल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात प्रकरण सुरु होते. (Latur) मी, तत्कालीन जि.प.चे अध्यक्ष पंडितराव धुमाळ, उपाध्यक्ष संभाजीराव पाटील हे खंडपीठात होतो. यावेळी त्या ठिकाणच्या काही वकिलांशी संवाद साधण्याचा योग आला. त्यांच्या बोलण्यातून हे जाणवले की, औरंगाबाद खंडपीठ मराठवाड्यातील जनतेसाठी खूप मोठी उपलब्धी आहे.

शिवाय वकिली क्षेत्रात उमेदीच्या काळातील विध्यार्थ्यांना तर हे खंडपीठ कायम मार्गदर्शकच ठरले आहे. (Aurangabad High Court) औरंगाबादेत खंडपीठ नसते तर मुबंईत खूप संघर्ष करावा लागला असता. पश्चिम महाराष्ट्रातील लोक खंडपीठासाठी अजूनही संघर्ष करत आहेत. दादासाहेबांमुळे हे शक्य झाले, अशा शब्दात (Sambhaji Patil Nilangekar)माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेचा प्रवास व आठवणींना उजाळा दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे नेते, माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यन्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या हस्ते यथोचित सन्मानापुर्वक करण्ययात आले. स्व. निलंगेकरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची निर्मिती भौगोलिक दृष्ट्या औरंगाबाद येथे होणे का गरजेचे आहे, हे केंद्र सरकारला पटवून दिले आणि हे खंडपीठ औरंगाबादेत झाले.

खंडपीठ व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा व कठोर परिश्रम आणि स्व. निलंगेकरांची तळमळ पाहून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खंडपीठाच्या प्रस्तावर शिक्कामोर्तब केले. स्व. इंदिरा गांधी यांचा दादांवर असलेला विश्वास व खंडपीठ स्थापन व्हावे यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार यातून हे घडले. आज संपूर्ण राज्याला या खंडपीठाचा फायदा होत आहे.

आज ४० वर्षानंतर दादांचे कार्य व त्यांच्या दूरदृष्टीची आठवण ठेवून ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद खंडपीठाकडून त्यांचा गौरव केला जात आहे, याचा मला मनस्वी आनंद होत असल्याची भावना संभाजी पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए.आर. अंतुले आणि तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश स्व. श्री. व्ही. एस. देशपांडे यांच्या ही तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT