माझ्या आधी खैरेंचा सत्कार कसा केला? भर सभेत संजय शिरसाट चिडले...

Sanjay Shirsath| Aurangabad Politics| संतापाच्या भरात संजय शिरसाट ताडकन उठत रामराम करत निघाले. पण इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरला त्यांना थांबवले
Aurangabad Politics|
Aurangabad Politics|

औरंंगाबाद : औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमातही शिंदे गट आणि शिवसेनेतील (Shivsena) गटबाजी समोर आली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण सत्कारासाठी खैरेंचे नाव आधी उच्चारल्याने शिरसाट चांगलेच नाराज झाले होते. पण बाजूला बसलेल्या इम्तियाज जलील यांनी त्यांना थांबवलं.

नक्की काय झालं?

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्यावतीने गणपती उत्सवानिमित्त शहरातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेही यांच्यासह एमआयएमचे इम्तियाज जलील हेदेखील उपस्थित होते. दोन्ही गटाचे आमदार एकाच सभाग़हात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने उपस्थितांचेही लक्ष त्याच्यांकडे लक्ष होते.

Aurangabad Politics|
MVP Election: मविप्र संस्थेत परिवर्तन घडणार!

पण कार्यक्रमात पहिली ठिणगी पडली ती आमदार संजय शिरसाट आणि पोलिस विभागात. सुत्रसंचालन करणाऱ्या सहायक आयुक्तांनी सत्कारासाठी व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत खैरे यांचे नाव उच्चारले. पण तितक्यात संतापाच्या भरात संजय शिरसाट ताडकन उठत रामराम करत निघाले. पण त्यांच्या बाजूलाच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून थांबवलं. सत्कारासाठी खैरेंचे नाव आधी घेतल्याने शिरसाट चांगलेच नाराज झाले होते.

इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरला त्यांना थांबवले. पण काय झाले हे सुरुवातीला कोणालाच कळले नाही. तेव्हा शिरसाटांनी रागात प्रोटोकॉल आहे की नाही, असे विचारले. त्यानंतर कराड आणि सावे यांनीही त्यांना बसण्याचा आग्रह धरला. इम्तियाज यांनीही त्यांचा हात सोडलाच नाही. आयुक्त गुप्ता यांनीही अधिकाऱ्यांना तत्काळ बदल करण्यास सांगितले आणि काही वेळातच वातावरण शांत झाले.

दरम्यान चंद्रकांत खैरेंचा आधी सत्कार झाल्याने शिरसाट यांचा पारा चांगलाच चढला होता. मात्र इतर नेत्यांनी त्यांना शांत करत बसण्याची विनंती केली. त्यामुळे शिरसाट यांचा राग काही प्रमाणात कमी झाला. पण तितक्यात समोर बसलेल्यांपैकी एकाने, खैरे साहाब, सिनियर है ना, क्या हुआ, असं म्हटलं आणि त्यांचा पारा पुन्हा चढला. त्याावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सिनियर होंगे तो घर पे लेके जाओ, असा टोला त्यांना लगावला. या सर्व गोंधळात मात्र खैरेंच्या चेहऱ्यावर शांतताच होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com