Ambadas Danve On Bhumre News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुमची अगरबत्ती मध्येच कुठे ओवाळतायं ? मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार; भुमरेंना दानवेंचा टोला..

Shivsena UBT : भुमरे यांनी जरांगे यांना उपोषण मागे घ्या, अशी विनवणी करतांना आरक्षण मिळाले नाही, तर जबाबदारी माझी असा विश्वास दिला होता.

Jagdish Pansare

Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मिटवण्यात सरकारला दुसऱ्यांदा अपयश आले. (Shivsena UBT News) गिरीश महाजन, अतुल सावे आणि संदीपान भुमरे या तीनही मंत्र्यांनी केलेले प्रयत्न उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या दृढ निर्धारापुढे अपुरे पडले. अर्धातास भुमरे, सावे, महाजन, खोतकर, टोपे जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, सरकारला वेळ द्यावा म्हणून झटत होते.

पण चार दिवसांची वेळ देत जरांगे यांनी पुन्हा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलला. दरम्यान, काल जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतांना रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी जरांगे यांना उपोषण मागे घ्या, अशी विनवणी करतांना मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाले नाही, तर जबाबदारी माझी असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर जरांगे यांनी काही विश्वास ठेवला नाही. (Shivsena) आता ठाकरे गटाने भुमरे यांच्या याच आश्वासनावरून त्यांना टार्गेट केले आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरेंच्या आरक्षणा संदर्भातील त्या विधानावरून त्यांना टोला लगावला आहे. (Marathwada) आपल्या फेसबुकवर पोस्ट करत दानवे यांनी मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार आहे, असे म्हणत डिवचले. अहो, संदीपान भुमरे तुमची कुठे मध्येच अगरबत्ती ओवाळताय!

मला जर उध्दव साहेबांनी सांगितले तर मी सातव्या मजल्यावरून उडी मारेन म्हणनारे, आणि लाचार होऊन तुम्हीच मंत्री पदासाठी शिंदे -फडणवीसांकडे पहिल्या रांगेत उभे होता.आणि आत्ता आरक्षणाची जबाबदारी घेता? अहो पण तुम्हाला कोण विचारत ? आणि आपल्याला मराठा समाज कायमचं घरी बसवण्याची जबाबदारी घेणार आहे, काळजी नसावी. ‌तोपर्यंत तुमचा दळभद्री पणा चालू द्या! अशा शब्दात दानवे यांनी भुमरेंवर निशाणा साधला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT