Jalna Maratha Protest News Sarkarnama
मराठवाडा

Maratha Protest News : नोंदी नाही तर आरक्षण नाही, ही सरकारची भूमिका चुकीची...

Jagdish Pansare

Jalna Political News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमचे शांततेत आंदोलन सुरू आहे. पण काही राजकीय नेत्यांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. (Maratha Reservation News) हे करण्यापेक्षा एकत्र येऊन मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण कसे देता येईल, याचा विचार व्हावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

संवाद साधने, शांततेत आंदोलन करणे आदी चर्चा नागरिकांसोबत व्हावी, मराठा समाजाची ताकद शासनाला दिसावी म्हणून १४ आक्टोबरला अंतरवाली येथे शंभर एकर जागेवर राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याचेही जरांगे यांनी या वेळी सांगितले. (Jalna) असल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बुधवारी (ता.27) पत्रकार परिषदमध्ये सांगितले.

राज्यात ३० सप्टेंबर ते ११ आक्टोबरदरम्यान जनतेशी संवाद साधणे, आंदोलनाचा आढावा घेणे, नागरिकांना शांततेचे आवाहन करणे यासह आरक्षण जनजागृतीसाठी दौरा करणार आहे. (Marathwada) अंतरवाली सराटी येथून ३० सप्टेंबरपासून हा दौरा सुरू करण्यात येणार आहे. (Maratha Reservation) अंबड, घनसावंगी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड ,परभणी, कळमनुरी, उमरखेड, परळी, अहमदपूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक आदी ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी सहकाऱ्यांसह भेट देणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी सांगितले.

१४ आॅक्टोबर रोजीच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. शंभर एकर जमिनीवर मंडप, पार्किंग आदी व्यवस्था केली आहे. येथे मोठ्या प्रमाणात राज्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. या दिवशी समाज बांधवांना तीस दिवसांच्या मुदतीमध्ये शासनाने काय निर्णय घेतले, समितीने काय काम केले, शासन स्तरावर कोणते अध्यादेश निघाले, याची माहिती दिली जाणार आहे. एवढे करूनही जर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर पुढे काय भूमिका घ्यायची, याबाबत या मेळाव्यातच निर्णय घेतला जाणार आहे.

शासनाकडे पुरावे आहेत, नोंदी आहेत; मग आरक्षण देण्यात काय अडचण आहे? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे, यासाठी २००४ च्या शासकीय अध्यादेशमध्ये दुरुस्ती करा पुरावे सापडले नाही, तर आरक्षण द्यायचे नाही? अशी भूमिका सरकार घेत असेल तर ती चुकीची आहे. सामाजिक स्थिती लक्षात घेऊन आरक्षण द्यावे, सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, यासाठी वेगळा प्रर्वग तयार करावा, अशी मागणीही जरांगे यांनी या वेळी केली.

काही नेते हे आरक्षण मान्य नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करणे चुकीचे आहे, ओबीसी- मराठा वाद निर्माण केला जात आहे, पण याला जनता बळी पडणार नाही. ओबीसीला धक्का लागणार नाही, वाद होऊ देऊ नका, राजकीय प्रतिष्ठेसाठी पुढारी हे प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आरक्षणाबाबत शासन व समिती काहीच माहिती देत नाही, संपर्क करत नाही. यांचे काय चालले हे कळत नसल्याची नाराजी मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT