Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Shivsena (UT) News : मेळाव्याला दोनशे लोकं जमतं नसतील तर आपली अवस्था काय ? हे ओळखा..

Shivsena : मेळाव्याला यायचं आणि गावात जावून काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेवून फिरायचे हे सामान्य कार्यकर्त्याला पटत नाही.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : मराठवाड्यात पहिल्यांदा स्थापन झालेल्या छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेचा ३८ वा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. (Sanjay Shirsat On Shivsena (UT) News) ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत मेळाव्याला कमी गर्दी झाल्यामुळे सध्या याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. संजय राऊत यांनी देखील आपल्या भाषणातून याबद्दल खंत व्यक्त करत स्थानिक नेत्यांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता.

आता याचा विषयावर शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. (Shivsena) वर्धापनदिनाच्या मेळाव्याला दोनशे लोक जमतं नसतील तर आपली किती वाईट अवस्था आहे, हे ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता ओळखलं पाहिजे. मेळाव्याला यायचं आणि काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा घेवून प्रचार करायचा हे काही सामान्य शिवसैनिकांना आवडत नाही.

अजूनही अनेकांना वाटते की ठाकरे गटाने काॅंग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडावी, मेळाव्याला गर्दी जमली नाही, यातून तेच सिद्ध होते, असा दावा देखील शिरसाट यांनी केला. (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे हा संपलेला माणूस आहे, त्याला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी टीका करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते टोकाची भूमिका घेवून आरोप-प्रत्यारोप करत राहणार.

मेळाव्याला गर्दी जमली नाही, कारण शिवसेनाप्रमुखांना मानणाऱ्या शिवसैनिकाला अजूनही काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जावू नये असेच वाटते. मेळाव्याला यायचं आणि गावात जावून काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेवून फिरायचे हे सामान्य कार्यकर्त्याला पटत नाही, म्हणून त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. हा मेळावा नव्हताच तर ती एका शाखेची बैठक होती असे म्हणावे लागेल. त्यांनी आता त्यांची ताकद ओळखली पाहिजे, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT