Dhnanjay Munde On Next Cm News : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच, वर्धापनदिनी मुंडेंचा संकल्प..

Ncp : शिवरायांनी रयतेला हवे असणारे स्वराज्य निर्माण केले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारसाहेबांनी उभा केला.
Dhnanjay Munde, News Beed
Dhnanjay Munde, News BeedSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्यात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष राहिले. (Dhnanjay Munde On Next Cm News) त्यानंतर सत्तांतर होवून शिंदे- फडणवीसांचे सरकार आले. परंतु येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा दावा आणि संकल्प माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

Dhnanjay Munde, News Beed
Aimim On Pmay News : पंतप्रधानांचे घरकुल, `सपनो का घर सपने मे`, एमआयएमने उडवल्ली खिल्ली..

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या (Ncp) वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाचे फेरबदल केले. (Beed News) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीत उत्साहाचे वातावरण आहे.

बीड जिल्ह्यात पक्षाचा वर्धापनदिन साजरा करतांना मुंडे यांनी तर पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असा दावा केला आहे. (Dhnanjay Munde) धनंजय मुंडे म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन आहे आणि या निमित्ताने संबंध राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आमचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी या पक्षात सर्वांना स्थान दिले आहे. जसे छत्रपती शिवरायांनी रयतेला हवे असणारे स्वराज्य निर्माण केले. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारसाहेबांनी उभा केला. त्यामुळे आज वर्धापनदिन साजरा करत असताना, येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असणार आहे. यासाठी आम्ही संकल्प केला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. बीडच्या शिरसाळा गावामध्ये ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com