Marathwada News : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशानूसार महावितरणने गुणवत्तापूर्वक वीज देणे बंधनकारक आहे. त्यासाठी वीज गुणवत्ता नियंत्रक यंत्र बसवणे आवश्यक आहे, परंतु राज्यात कुठेही असे यंत्र महावितरण कंपनीने बसवलेले नाही. (Aurangabad Political News) उलट शेतकरी आणि सर्वसामान्यांची वीज बील भरले नाही म्हणून कट करण्याचा धडाका सुरू केला आहे.
नियामक आयोगाच्या आदेश आणि कायद्यानूसार तुम्हाला वीज कट करता येणार नाही. तुम्ही लोकांची वीज कट करण्याचा अट्टाहास कराल, तर मी तुमच्या वीज वितरणाचे लायसन्स रद्द करण्याचा अट्टाहास करील, असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी महावितरणला दिला आहे. (Kannad) कन्नड तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्यांची वीजबिल थकले म्हणून कट केली जात आहे. या संदर्भात हर्षवर्धन जाधव यांनी संताप व्यक्त करत महावितरण कंपनीलाच धारेवर धरले आहे.
महाराष्ट्र वीज नियमाक आयोगाच्या कायदा व त्या अंतर्गत कलमाचा उल्लेख करत त्यांनी वीज कंपनीचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (Marathwada) नियामक आयोगाच्या निर्देशानूसार गुणवत्तापुर्ण वीज पुरवठा आणि त्याचे मोजमाप करणारे यंत्र महावितरणने बसवणे बंधनकारक आहे. असे असतांना राज्यात कुठेही असे यंत्र बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकांना पुरवण्यात येणारी वीज ही गुणवत्तापुर्ण आहे की नाही ? हे तपासणारी यंत्रणाच महावितरणकडे नाही. मग असे असतांना वीजबिल थकले म्हणून लोकांचा विद्युत पुरवठा कोणत्या नियमाने कट करता? असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितीत केला.
जर लोकांची वीज तोडली, तर मी तुमचे वीज वितरणाचे लायसन्सच रद्द करण्याची मागणी वीज नियामक आयोगाकडे करील, असा इशाराच जाधव यांनी दिला आहे. लोक आता सज्ञान झाले आहेत, त्यांना कायदा कळतो, तेव्हा वीज कट करण्याचा अट्टाहास करू नका. लोकांकडे पैसे मागू नका, असे आवाहन देखील त्यांनी महावितरणला केले. यावर वीज वितरण कंपनी काय भूमिका घेते ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.