Aurangabad Political News : `आदर्श`, घोटाळ्यातील सर्व आरोपींना पाच दिवसात अटक करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू..

Scam News : आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर घोटाळ्यातील इतर आरोपींच्या मुसक्या पोलिस कधी आवळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Aurangabad Political News
Aurangabad Political News Sarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jalil News : हजारो ठेवीदारांचे दोनशे कोटीहून अधिक रुपये बुडवणाऱ्या आदर्श पतसंस्थेच्या सर्व आरोपींना पाच दिवसात अटक करा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा गर्भित इशारा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. (Aurangabad Political News) पतसंस्थेच्या ठेवीदारांची बैठक सुभेदारी विश्रामगृहात इम्तियाज यांनी घेतली. या घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पतसंस्थेचा अध्यक्ष अंबादास मानकापे आणि तीन संचालकांना अटक केली आहे. परंतु उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट आहेत.

Aurangabad Political News
Beed Ncp Political News : बीडमधील पवारांच्या सभेतून क्षीरसागर देणार अजितदादांना आव्हान..

या प्रकरणातील सर्व आरोपींना येत्या पाच दिवसात अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरून मोर्चा, धरणे, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इम्तियाज (Imtiaz Jalil) यांनी या बैठकीत दिला. आदर्श नागरी पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांच्या ठेवी संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्ज वाटप केल्यामुळे धोक्यात आल्या आहेत. (Scam News) आयुष्यभराची कमाई बुडाली या धक्क्याने एका तरुण ठेवीदाराने आत्महत्या देखील केली.

पोलिसांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी नेमली, अध्यक्षासह तीन संचालकांना अटक केली, परंतु अजूनही या घोटाळ्यातील इतर आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. (Aurangabad) आजच्या बैठकीत पोलिसांनी या घोटाळ्याशी संबंधित सर्व आरोपींना येत्या पाच दिवसांत अटक करावी, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. पतसंस्थेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली वेगाने सुरू असल्या तरी ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार? हा प्रश्न कायम आहे.

पतसंस्थेतील घोटाळ्याचा मास्टर माईंड मुख्य आरोपी अंबादास मानकापे याच्याकडून त्याची संपत्ती जप्त करून ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात शपथपत्र लिहून घ्यावे. त्यासाठी त्याच्यावर दबाव आणावा, अशी मागणी देखील इम्तियाज यांनी यापुर्वी केली होती. शिवाय राज्य सरकारने पतसंस्था, सहकारी बॅंकामधील ठेवीदारांच्या पैशाची हमी घ्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली होती. आता आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर घोटाळ्यातील इतर आरोपींच्या मुसक्या पोलिस कधी आवळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com