Vinayk Mete-Dhnanjay Munde
Vinayk Mete-Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

सपना चौधरीच्या ठुमक्यांतून वेळ मिळाला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या

Dattatrya Deshmukh

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम ठेवला आणि समर्थकांनी उदंड प्रतिसाद दिला. मुंडे यांनीही विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. मात्र, सपना चौधरीच्या ठुमक्यांमुळे कार्यक्रमावर टीका सुरू झाली आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या तर्फे शनिवारी सायंकाळी परळी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी परळीत दिवाळी स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मतदार संघासह जिल्ह्यातूनही अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

कार्यक्रमाचे नियोजन देखील निटास होते. उपस्थितांना लाल व गुलाबी रंगाचे फेटे चढविण्यात आले, कार्यक्रमासाठी मुंडे यांच्यासह पत्नी जयश्री मुंडेही होत्या. कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकारसह स्थानिक विरोधकांवरही फटकेबाजी केली. विकास कामांचा उपाहपोहही केला. मात्र, कार्यक्रमात नृत्यांगणा सपना चौधरीच्या नृत्याचा कार्यक्रमामुळे आता टिका सुरु झाली आहे.

जिल्ह्यात तब्बल ११ वेळा अतिवृष्टी होऊन नऊ लाख शेतकऱ्यांचे साडेसहा लाख हेक्टरांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी मदतीची रक्कम दिवाळी संपूनही शेतकऱ्यांच्या हाती नाही. तसेच, एकट्या ऑक्टोबर महिन्यात २५ शेततकऱ्यांनी जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. तर, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपही सुरु आहे.

अशा परिस्थितीत सपना चौधरीचे ठुमके विरोधकांसाठी मुद्दा झाला आहे. सपना चौधरीच्या ठुमक्यांतून वेळ मिळाला तर मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. तर, शेतकरी संकटात असताना पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे शेकापचे मोहन गुंड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT