Imtiaz Jaleel, Asaduddin Owaisi  Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : एमआयएमच्या ओवैसींचा दावा, इम्तियाज जलील फिर से...

Jagdish Pansare

Marathwada News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती मैदानात उतरली आहे. दोन्ही पक्षांचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नसले तरी प्रचार दणक्यात सुरू आहे. या धामधुमीत गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारे खासदार इम्तियाज जलील मात्र सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतात.

आय जे महोत्सवामध्ये गुंतलेले इम्तियाज सगळ्या राजकीय पक्षांच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 2019 च्या निवडणुकीत वंचितसोबत आघाडी असल्यामुळे 'एमआयएम'चा विजय दृष्टिक्षेपात आला होता. मात्र आता वंचितने थेट ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्या विजयाचे गणित बिघडणार, असा अंदाज वर्तवला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो कथ्रा!)

इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel ) यांनी आयोजिलेल्या महोत्सवातील क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) नुकतेच संभाजीनगरात येऊन गेले. राज्यातील सत्तासंघर्षावर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांचा दुसरा विजय निश्चित असल्याचा दावा केला होता.

महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमध्ये असलेल्या कुरबुरी पाहता एमआयएमला चांगले वातावरण असल्याचा निष्कर्ष ओवैसी यांनी काढला होता. त्यांचा हा दावा किती खरा आणि किती खोटा? हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट होईलच. गेल्या निवडणुकीत मिळालेली एकगठ्ठा दलित मते बाजूला गेली आहेत.

असे असताना ओवैसी इम्तियाज यांच्या दुसऱ्या विजयाची खात्री कशाच्या आधारावर देत आहेत? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आलेली असताना एमआयएमला राज्यात युतीसाठी एकही पक्ष सापडलेला नाही. अशावेळी 2019 मध्ये घडवलेला चमत्कार इम्तियाज जलील पुन्हा घडवणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R...

SCROLL FOR NEXT