Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा पतंग उडणार? की कटणार...

Nanded Loksabha Constituency : माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा कोण करतं?
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव. दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाणांचे दिल्ली दरबारीही मोठे वजन आहे. सध्या चव्हाणांची चर्चा होते ती त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्यांनी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या महिन्यातील आपल्या नांदेड दौऱ्यात चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाला पुन्हा एकदा हवा दिली.

आता चव्हाणांनी याविषयावर प्रतिक्रिया देणेही सोडून दिले आहे. उलट माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा कोण करतं? असे म्हणत ते नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यांचीही अनेकदा खिल्ली उडवली आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मुंबईत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

Ashok Chavan
Monika Rajale : एकहाती सत्ता तरी मोनिका राजळेंचा कस लागणार; समर्थकांनीच वाढवली डोकेदुखी

वडिलांपासून अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालवलेल्या मिलिंद देवरांनी शिवसेनेचा पर्याय स्वीकारल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी पुन्हा येत्या काही दिवसात आणखी मोठे धक्के आणि काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे दावे करायला सुरूवात केली आहे.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अशोक चव्हाण (Ashok Chavan) नांदेड या आपल्या शहरात पंतग उडवताना दिसले. माजी आमदार अमर राजूकर यांनी चव्हाणांचा पंतग हवेत उडवला आणि चव्हाणांनी तो उंच आकाशात नेला. याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाले. यानंतर नांदेडमध्ये एकच चर्चा सुरू झाली की अशोक चव्हाणांचा यंदा पंतग उडणार, की कटणार?

Ashok Chavan
Marathwada Water Crisis : दुष्काळात तेरावा महिना; राजेश टोपेंनी थेट मुद्द्यावरच बोट ठेवलं

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधून अशोक चव्हाण यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. एकीकडे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा तर दुसरीकडे काँग्रेसकडून चव्हाण यांना पुन्हा दिल्ली गाठण्यासाठी गळ घालण्याचे प्रयत्न. त्यामुळे चव्हाण नेमका काय निर्णय घेतात? याकडे त्यांच्या समर्थकांचे आणि विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. तोट्यात असलेल्या कारखान्याला दीडशे कोटींची थकबाकी चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारकडून मिळवली. याचा थेट संबंध चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाशी खासदार चिखलीकर यांनी जोडत खुलासा करण्याचे आवाहन दिले होते. आता आजच्या पंतगबाजीनंतर अशोक चव्हाण विरोधकांचा पतंग कापणार? की मग त्यांचीच दोर भाजपच्या हातात जाणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan
Boycott Maldives : मोदींचा अपमान सहन करणार नाही; मालदीवची टूरच रद्द, साऊथच्या अभिनेत्याचा 'अँग्री' रोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com