Imtaiz Jaleel News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात सत्यता असेल तर जेलमध्ये जाईल, इम्तियाज जलील यांचे पोलिस महासंचालकांना पत्र!

Imtiaz Jaleel Write A Letter To DGP : 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांशी झालेल्या वादातून पहिला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा इम्तियाज यांच्याविरोधात दाखल झाला.

Jagdish Pansare

  1. अॅट्राॅसिटी प्रकरणात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

  2. पोलिसांवर राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला.

  3. या प्रकरणाबाबत पोलिस महासंचालकांना पत्र देत न्याय मिळवण्याची मागणी करण्यात आली.

Aimim News : एमआएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात दोन अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर इम्तियाज यांनी पुन्हा एकदा आपल्यावर राजकीय दबावातून बोगस गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हे गुन्हे दाखल करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी करणारे पत्र त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे.

माझ्या विरोधात दाखल गुन्ह्यांमध्ये सत्यता असेल तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. पण त्याआधी पोलीस खात्याला बदनाम करू पाहणाऱ्या, राजकीय दबावात खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या पत्रात केली आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांशी झालेल्या वादातून पहिला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा इम्तियाज जलील यांच्याविरोधात दाखल झाला होता.

तर दुसरा गुन्हा सत्ताधारी मंत्र्यांच्या गैरकारभाराची माहिती जाहीरपणे माध्यमांना देत असताना वारपरलेल्या एका शब्दावरून दुसरा गुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता एमआयएमचे (Aimim) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. या प्रकरणात न्यायालयात हजर राहून जामीन घेण्यासाठी पोलीसांनी इम्तियाज यांना नुकतीच नोटीस बजावली होती. आता यावरून त्यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली.

माजी विधानसभेचे सदस्य (2014-19 आमदार) आणि माजी खासदार (2019-24 खासदार) म्हणून मला तुम्हाला हे कळवताना खूप दुःख होत आहे की, माझ्या मतदारसंघातील काही पोलिस अधिकारी अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत बोगस गुन्हे दाखल करून लोकप्रतिनिधींना त्रास देण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी भाजप उमेदवार अतुल सावे यांना बोगस मतदान करणाऱ्या काही दलित लोकांना आमच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले होते.

तेव्हा माझ्याविरुद्ध या कायद्याअंतर्गत अत्याचाराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला. सावे यांनी पुंडलिक नगर पोलिसांवर दबाव आणल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला पूर्णपणे खोटा, निराधार आणि वाईट हेतूने दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या तीव्र दबावानंतर याच कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. मी मंत्र्यांच्या भ्रष्ट कारवायांचा पाठपुरावा करत होतो आणि ते माध्यमांसमोर उघड करत होतो.

पोलीसांकडून माझ्यावर दबाव

ज्यामुळे त्यांनी पोलिसांवर खटला दाखल करण्यासाठी दबाव आणला. माझ्यावर आरोप असा होता की मी 'हरिजन'हा शब्द वापरला होता, जो मी एका ताज्या सरकारी कागदपत्रातून वाचून दाखवला होता. आता पोलिसांनी माझ्यावर एसीपीसमोर जबाब देण्यासाठी आणि न्यायालयात कायदेशीररित्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी दबाव आणला आहे. कशासाठी? यावरून फक्त एका लोकप्रतिनिधीविरुद्ध बनावट खटला दाखल करून, विभाग सामान्य लोकांशी कसा वागत आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचे इम्तियाज यांनी या पत्रात नमूद केले.

मी नेहमीच पोलिस विभागाचा मोठा चाहता आणि समर्थक राहिलो आहे, त्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. जर या प्रकरणांमध्ये थोडीशीही सत्यता असेल तर मी तुरुंगात जाण्यास तयार आहे. न्यायालयाला योग्य वाटेल ती कोणतीही कारवाई त्यांनी माझ्यावर करावी. ज्या पोलिस ठाण्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ते अधिकारी गणवेशातील लोकांना बदनाम करतात.

कायदा त्यांच्या राजकीय मालकांच्या इशाऱ्यावर नाचू शकत नाही, जे माझ्याविरुद्धच्या दोन्ही एफआयआरमध्ये घडले आहे. मी तुम्हाला चौकशी करण्याची कळकळीची विनंती करतो आणि मला खात्री आहे की पोलिस त्यांच्या राजकीय मालकांच्या इशाऱ्यावर कसे वागत आहेत हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. काहीही झाले तरी मी कोणाचेही गैरकृत्य उघड करत राहीन, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

FAQs

प्र.1. इम्तियाज जलील यांच्यावर कोणते प्रकरण दाखल झाले आहे?
अॅट्राॅसिटी प्रकरणात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

प्र.2. पोलिसांवर कोणता आरोप करण्यात आला आहे?
राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप आहे.

प्र.3. पत्र कोणी दिले आणि कुठे दिले?
जलील यांनी पोलिस महासंचालकांना पत्र दिले.

प्र.4. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम झाला?
छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात या प्रकरणामुळे वाद

प्र.5. जलील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली का?
त्यांनी प्रकरणात सत्यता असेल तर जेलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT