Aimim News : शासकीय दस्तावेजात उल्लेख करणारे नामानिराळे, मग मी गुन्हेगार कसा ? इम्तियाज जलील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

MIM has warned the government of an agitation if an objectionable word is not removed from official documents. : महाराष्ट्रातील शासकीय दस्तावेजात नमुद केलेले तो अपशब्द तात्काळ काढण्यात यावा. अन्यथा सरकार विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.
Imtiaz Jaleel On Fir Filed News
Imtiaz Jaleel On Fir Filed NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्रातील शासकीय दस्तावेजात नमुद केलेले तो अपशब्द तात्काळ काढण्यात यावा. अन्यथा सरकार विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, महसुल विभागाचे सचिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (एसडीएम), ग्रामीणचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी या सर्वांनी संगनमताने जाणीवपूर्वक, हेतुपुर्वक मागासवर्गीय समाजास अपमानित करुन धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा अपशब्दाची अधिकार अभिलेख पत्रकात (7/12) लिखितमध्ये नोंद घेतल्याने त्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विभागीय आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.

एमआयएम (Aimim) पक्षाच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन महसुल अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन उच्चस्तरीय चौकशी करावी आणि महाराष्ट्रातील सर्व शासकीय दस्तावेजातुन तो अपशब्द तात्काळ काढण्यात यावा, अशी मागणी केली. अन्यथा एमआयएमच्या वतीने सरकार विरोधात राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मौजे सहाजापूर गट क्र. 8 ही जमीन भोगवटादार वर्ग - 2 प्रवर्गात मोडते. सबब जमीन ही शासकीय गायरान जमीन असुन त्याचे एकुण क्षेत्र 15.80. हेक्टर आहे.

त्यात पोट-खराब क्षेत्र (लागवड अयोग्य) वर्ग (ब) क्षेत्रधारण असलेली 2.03 हेक्टर जमीन आहे. जमीनीच्या अधिकार अभिलेख पत्रकात (7/12) मध्ये हस्तांतरित न होणारे सरकारी जमीन असे स्पष्टपणे उल्लेख आहे. विशेष म्हणजे ही हस्तांतरित न होणारी सिलिंग जमीन असुन मागासवर्गीय समाजास उदरनिर्वाह करण्यासाठी देण्यात आली होती. (Imtiaz Jaleel) सबब अधिकार अभिलेख पत्रकाच्या इतर अधिकारात सक्षम प्राधिकार्‍यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी – इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुन) आणि नामे लक्ष्मण भिका आणि त्रिंबक पुंजाजी या दोघांना फेरफार क्र. 318 अन्वये 'खासवर हरीजन' म्हणून देण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.

Imtiaz Jaleel On Fir Filed News
Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांच्या निषेधासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 रोजी मोर्चा..

परंतु महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी महसुल अधिकारी यांच्या सोबत संगणमताने दिनांक 05.01.2023 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय क्र. 5 औरंगाबाद येथे बेकायदेशिररित्या नोंदणीकृत खरेदीखत केले. मंत्री संजय शिरसाट यांनी भोगवटादार वर्ग -2 ची हस्तांतरित न होणारे 4 हेक्टर शासकीय जमीन एक कोटी दहा लाख रुपयात मुलगा क्र. 1 सिध्दांत संजय शिरसाट , मुलगा क्र.2 तुषार संजय शिरसाट या दोघांच्या नावाने खरेदी करुन अधिकार अभिलेख पत्रकात (7/12) फेरफार क्र. 4348 अन्वये नावाची नोंद सुध्दा घेतलेली असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद केले.

Imtiaz Jaleel On Fir Filed News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel : इम्तियाज-शिरसाट समर्थकांमध्ये हाणामारी! परस्परविरोधी तक्रारीनंतर गुन्हे दाखल

मंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय जमीन बेकायदेशिररित्या लाटल्याने त्यांच्या विरोधात मी स्वत: दिनांक 11.06.25 रोजीच्या पत्रकार परिषदेत सबळ पुराव्या आधारे भ्रष्टाचाराचे आरोप लावुन तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जारी केलेले शासकीय अधिकार अभिलेख पत्रकात (7/12) संबंधित अधिकारी यांनी जे लिहिलेले आहे ते फक्त मी वाचुन त्याची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली.

Imtiaz Jaleel On Fir Filed News
Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सकडे तक्रार करणार! कारवाई न झाल्यास कोर्टात धाव!

मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्री पदाचा गैरवापर करुन पोलीस प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करुन माझ्या विरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदविला आहे. परंतु गुन्हा नोंदवित असतांना ज्या शासकीय दस्तामध्ये कायद्याचे संपुर्ण ज्ञान असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, महसुल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, ग्रामीणचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी या सर्वांनी संगनमताने जाणीवपूर्वक अधिकार अभिलेख पत्रकात अपशब्दाची लिखितमध्ये नोंद घेतलेली आहे त्या सर्वांचे नावे वगळण्यात आले.

Imtiaz Jaleel On Fir Filed News
Imtiaz Jaleel On Chhatrapati Sambhajinagar : 'छत्रपती संभाजीनगर' नावाला विरोध का? इम्तियाज जलीलांनी थेट पुणे, कोल्हापूर, नागपूरच्या नावात बदल सुचवला

पोलीस विभागाने सुध्दा ज्या अधिकार्‍यांनी संगनमताने सर्व मागासवर्गीय समाजास अपमानीत करून धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा अपशब्दाची लिखित मध्ये नोंद घेऊन गुन्हा केलेला आहे. त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. ज्या अधिकार्‍यांनी गुन्हा केलेला आहे ते निर्दोष आणि जो गुन्हा घडलेला आहे त्याची फक्त माहिती पत्रकार परिषदेत देणारा मी गुन्हेगार हे कसे काय शक्य आहे ? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी तक्रारीत उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com