Imtiaz Jaleel On Navneet Rana Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel Vs Navneet Rana : इम्तियाज जलील यांचं नवनीत राणांबद्दल गंभीर विधान, म्हणाले 'अशा महिलेला...'

Imtiaz Jaleel Controversial statement about Navneet Rana: 'नवनीत राणा या एससी प्रवर्गाच्या आहेत, त्यांना...' असंही जलील म्हणाले आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : 'नवनीत राणा या बत्तमीज आहेत, त्यांना चीप पब्लिसिटीची हौस आहे. यातूनच त्या अनेकदा वेगवेगळ्या लोकांवर बोलत असतात. अशा महिलेला आम्ही फार महत्त्व देत नाही,' अशा शब्दांत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जलील म्हणाले, 'नवनीत राणा या एससी प्रवर्गाच्या आहेत, तेव्हा त्यांना संविधान माहीत नाही का? असे म्हणत इम्तियाज यांनी थेट राणा यांच्या जातीचा उल्लेख करत त्यांच्यावर हल्ला चढवला. संसदेतही या महिला महाशय आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी मोठ्याने बोलत असतात. आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेच्या सभागृहात स्पष्टपणे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आम्हाला आदर असल्याचे सांगितले आहे.' (Imtiaz Jaleel Controversial statement about Navneet Rana)

याचबरोबर 'आम्हाला रामाबद्दल आदर आहे, नथुरामबद्दल नाही, ही आमची भूमिका आहे. पण हरकत नाही, इतर कुणी टीका करायला सापडले नाही म्हणून त्या महिलेने ओवेसींवर टीका केली असेल. आम्हाला रामाबद्दल शिकवणाऱ्या या महिलेला मात्र हनुमान चालिसा स्वतःच्या घरात नाही, तर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊन म्हणायची असते. यावरून केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करण्यात पटाईत असलेल्या या महिलेबद्दल फार बोलण्याची गरज नाही. आम्ही तिला अजिबात महत्त्व देत नाही,' असे सांगत इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली.

याशिवाय, 'अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनीत राणा यांना आता भाजपचा पाठिंबा आणि उमेदवारी हवी आहे, त्यामुळेच त्यांनी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आमच्यावर टीका केली आहे,' असे इम्तियाज जलील म्हणाले.

अमरावती येथील एका खासगी कार्यक्रमात बोलताना राणा यांनी इम्तियाज जलील व त्यांच्या एमआयएवर टीका केली होती. 'इस देश मे अगर रहेना होगा, तो श्रीराम कहेना होगा. हिंमत असेल तर अमरावतीतून इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवून दाखवावी, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ,' असे जाहीर आव्हान खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी दिले होते.

त्यानंतर सोशल मीडियावर राणा विरुद्ध इम्तियाज जलील समर्थकांमध्ये युद्ध रंगले होते. छत्रपती संभाजीनगरवर इम्तियाज जलील यांच्या विजयाने लागलेला डाग, या वेळी संभाजीनगरकर पुसून टाकतील, असं म्हणत नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला होता. यावरून इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना सुनावले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने आपल्या प्रचाराची सुरुवात विदर्भातून केली आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांच्या अकोला जिल्ह्यातून एमआयएमने लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले. त्यानंतर अमरावती, चंद्रपूर, नागपूर अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये आपण सभा घेणार असल्याचे इम्तियाज यांनी जाहीर केले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT