Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातूनच ओवेसी उडविणार ‘पतंग’

MIM Vs Vanchit Bahujan Aghadi : बाळासाहेबांचा राजकीय मांजा कापणार का एमआयएम?
Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.
Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी होत आहे. अशात आता एमआयएमने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. रविवारी (ता.18) एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पहिली सभा अकोला लोकसभा मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम अकोला लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील दहा जागांवर लढण्यासाठी एमआयएम इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने जवळपास सर्वच पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थातच एमआयएमनेही राज्यात स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रातून करणार असल्याचे सांगत असुदुद्दीन ओवेसी यांची महाराष्ट्रातील पहिलीच अकोला लोकसभा मतदारसंघात होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या बालेकिल्ल्यातूनच एमआयएमने प्रचाराला सुरुवात केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने एकत्रित लोकसभा निवडणूक लढवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.
Akola AMC : लवकरच उभी होणार अकोला महापालिकेची नवी इमारत

गेल्या निवडणुकीत ‘वंचित’चा एमआयएमला मोठा फायदा झाला होता. आताच्या संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे एकमेव खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ‘वंचित’ आणि एमआयएमची युती तुटल्याने एमआयएम एकटीच रिंगणात उतरणार आहे. राज्यातील मुस्लिमबहुल असलेल्या दहा जागांपेक्षा अधिक जागा एमआयएम लढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, मुंबई, धुळे मालेगाव यासह वेगवेगळ्या मुस्लिम बहुल मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातही एमआयएम उमेदवार देण्याची शक्यता आहे.

मतांचे गणित पाहता राज्यातील पहिलीच सभा ही अकोला मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एमआयएम अकोला लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे संकेत असले, तरी केवळ मुस्लिम मतांवर स्वार होऊन लोकसभा निवडणूक लढण्याचा ‘प्लान’ जरी असला तरी ते या निवडणुकीत जिंकणे शक्य होईल की नाही, हा येणारा काळ ठरवेल. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या संबंधांचा आरोप केला होता. प्रकाश आंबेडकर यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते.

Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.
Prakash Ambedkar News : प्रेमाच्या रंगातून 'वंचित'ने टाकला राजकीय प्रेमाचा 'डाव'!

आंबेडकर यांनीही बोलताना, एमआयएमसोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर फार परिणाम होणार नाही, असे नमूद केले आहे. गेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने ‘वंचित’ आघाडीला मतदान केले नव्हते, असे म्हटले होते. आता राज्यभर एमआयएम लोकसभा निवडणुकीसाठी सभा घेत असतानाच सभेची सुरुवातच असदुद्दीन ओवेसी आंबेडकर यांच्या बालेकिल्ल्यात होणार आहेत. त्यामुळे एमआयएमचा पुढचा ‘प्लान’ हा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा असू शकतो. असं राजकीय जाणकारांचे मत आहे.

Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.
Shiv Sena : मित्र असलेल्या उद्धव ठाकरे गटाला ‘वंचित’चा जोर का झटका, पण अगदी धीरे से...

एमआयएमने अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविल्यास मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बाळापूर या मुस्लिम बहुल मतदारसंघात एमआयएमने डॉ. रहेमान खान यांना उमेदवारी दिली होती. खान यांचा मोठा फटका ‘वंचित’च्या उमेदवाराला बसला होता. एमआयएमचे उमेदवार डॉ. रहेमान खान यांनी तिसऱ्या क्रमांकाची तब्बल 44 हजार 507 मते घेतली होती. या मतदार संघात मुस्लिम, दलित मतांचे एमआयएम व वंचित बहुजन आघाडीमध्ये विभाजन झाल्यामुळे सेनेला एकगठ्ठा हिंदू मतांचा लाभ झाला होता. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात एमआयएम ने उमेदवार दिल्यास त्याचा ‘वंचित’ला फटका बसेलच. सोबत भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Asaduddin Owaisi & Prakash Ambedkar.
Aaditya Thackeray News : पुन्हा मिठाचा खडा,'वंचित'ची ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com