Sanjay Shirsat -Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या राजकीय दबावामुळेच माझ्यावर ॲट्रॉसिटी! कोर्टात खेचणार..

AIMIM MP Imtiaz Jaleel expresses anger over being booked under the Atrocity Act and accuses Shirsat of exerting political pressure on the police. ज्या 'हरिजन' शब्दाच्या उल्लेखामुळे आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो शब्द सरकारी कागदावर नमूद करण्यात आलेला आहे. तो मी फक्त वाचून दाखवला

Jagdish Pansare

AIMIM News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी, एमआयडीसीतील भूखंड आणि सरकारी जमीन असे आरोप करत खळबळ उडवून देणाऱ्या एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ॲट्रॉसिटीचे गुन्हे व तक्रारी दाखल केल्या जात आहेत. संजय शिरसाट यांनी आपल्या मुलांच्या नावे सहाजापूर येथे दहा एकर वर्ग दोनची जमीन खरेदी केल्याचा आरोप आणि त्या संदर्भातील पुरावे इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिले होते.

यावेळी त्यांनी 'हरिजन' असा उल्लेख केला होता. यावरूनच इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावर इम्तियाज जलील यांनी आज आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच मंत्री संजय शिरसाट यांच्या राजकीय दबावातूनच पोलिसांनी आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांचा अंतिम संस्कार झाला आहे, असे म्हणत पोलिसांविरोधात आपण सोशल मीडियावर मोहीम राबवणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी जाहीर केले.

ज्या 'हरिजन' शब्दाच्या उल्लेखामुळे आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो शब्द सरकारी कागदावर नमूद करण्यात आलेला आहे. तो मी फक्त वाचून दाखवला, जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मग जिल्हाधिकारी, महसूल विभाग आणि सरकारवरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. क्रांती चौक पोलीस स्टेशन समोर ज्या लोकांनी माझ्या नावाने बोंबा मारल्या ते लोक संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे बगलबच्चे असून सामाजिक न्याय विभागाकडून सात कोटी रुपयांची फाईल मंजूर करण्यासाठी त्यांनी माझ्या विरोधात आंदोलन करून पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.

या खोट्या आणि दबावाला पडून दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात आपण कोर्टात धाव घेणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. संजय शिरसाट यांच्यावर जे आरोप आपण केले आहेत ते पुराव्यासहित केले आहेत. मला दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्याने आपल्या समर्थकांकडून माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. पोलीस प्रशासनही कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता गुन्हे दाखल करत असल्याने खऱ्या अर्थाने पोलीस मंत्री संजय शिरसाट यांच्या दबावात काम करत असल्याचे स्पष्ट होते.

त्यामुळे पोलीस आयुक्त व ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्या सगळ्या पोलीस निरीक्षकांविरोधात आपण सरकारकडेही तक्रार करणार आहोत. राज्याचे गृहमंत्री जे मुख्यमंत्रीही आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून माझ्यावर दाखल केलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा कशाच्या आधारे दाखल केला हे विचारले पाहिजे, अशी मागणीही इम्तियाज जलील यांनी केली.

दरम्यान पोलीस दबावाखाली काम करत असल्याने या पोलिसांचा 'अंत्यसंस्कार' झाला असे मी म्हणतो आणि त्यामुळे या संदर्भात शहरात पोलिसांच्या विरोधात शोकसभा घेऊन निषेध करणारे आंदोलन छेडणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. ज्या ज्या कुणावर पोलिसांकडून राजकीय दबावातून अशा प्रकारे अन्याय झाला असेल त्या सगळ्या राज्यभरातील माझ्या समर्थकांनी सोशल मीडियावर मी उभारणार असलेल्या मोहिमेवर व्यक्त व्हावे ,असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT