Imtiaz Jaleel On Subhash Desai : 'त्या' नोटिसची इम्तियाज जलील अजून वाट पाहातायत; सुभाष देसाईंना डिवचलं, नेमकं काय आहे प्रकरण...

Aimim Imtiaz Jaleel Alleges Subhash Desai in Chhatrapati Sambhajinagar Chikhalthana Industrial Estate Land Case : छत्रपती संभाजीनगरमधील खंटुलेल्या औद्योगिकरणाचा विकासाच्या मुद्यावर माजी खासदार इम्तियाज जलील आक्रमक आहेत.
Imtiaz Jaleel On Subhash Desai
Imtiaz Jaleel On Subhash DesaiSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : 'AIMIM'चे माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मागे लागलेत. मंत्री शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील वेगवेगळे भूखंड खरेदीचे आरोप करत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांच्या आरोपांना हलक्यात घेतलं आहे.

मंत्री शिरसाट यांचं ताजं प्रकरण सुरू असताना, जलील यांनी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चिखलठाणा औद्योगिक वसाहत प्रकरणाला 'सरकारनामा'शी बोलताना उजाळा दिला. या प्रकरण एवढं तापलं होती की, सुभाष देसाईंना प्रत्युत्तर देताना, इम्तियाज जलील यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा दिला होता. यावर अजूनपर्यंत 'त्या' नोटीसची वाट पाहत असल्याची खिल्ली जलील यांनी उडवून देसाई यांना डिवचलं.

माजी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या (छत्रपती संभाजीनगर) औद्योगिकरणाला ज्यापद्धतीने गती मिळालयाला पाहिजे होती, ती झालेली नाही, यावर 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'शी डिजिटलशी बोलताना ठाम मत व्यक्त केलं. सत्ता ही मोजक्यात लोकांना आपल्यासाठीच हवी आहे, त्यांनी देशासमोर, महाराष्ट्रासमोर असलेल्या उभ्या ठाकलेल्या बेरोजगारीचं, शेतकऱ्यांवरील (Farmers) संकटांचं काहीच देणंघेणं नाही, असे म्हणत, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविषयी चिड व्यक्त केली.

औरंगाबादच्या (छत्रपती संभाजीनगर) चिखलठाणा औद्योगिक वसाहत सुभाष देसाई पालकमंत्री असताना सर्व विकून टाकला. देसाई आणि त्याच्या मुलांनी सर्व मोठमोठ्याला बिल्डर्स विकून टाकल्याचा आरोप केला होता, याची आठवण इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली.

Imtiaz Jaleel On Subhash Desai
AIMIM vs Shivsena : खैरे, भुमरे, दानवे किती 'अभ्यासू'? इम्तियाज जलीलांकडून 'पोलखोल'

'जेव्हा असा आरोप केला होता, तेव्हा देसाईंनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशारा दिला होता. देसाईंनी यासाठी नोटिसची आठवण करून देण्यासाठी ट्विट देखील केले होते. नोटिसीची वाट पाहत आहे, असे त्यात म्हटले होते. पुन्हा ट्विट केले. पण काहीच झालं नाही, मी अजूनही त्या नोटिसची वाट पाहत आहे', असे सांगत इम्तियाज जलील यांनी देसाई पिता-पुत्रांना डिवचलं.

Imtiaz Jaleel On Subhash Desai
Imtiaz jaleel News : इम्तियाज जलील मागेच लागले; संजय शिरसाट यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्री, राज्यपालांची मागितली भेट!

मंत्र्यांना टक्केवारी, तर अधिकाऱ्यांचे साटेलोटे

औरंगाबादच्या (छत्रपती संभाजीनगर) औद्योगिकरणाचा विस्तार झाला असता, तर आज मराठवाड्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण ते झालं नाही. टक्केवारी घेता, त्यात पार्टनर होता, बिल्डर तिथं मोठ-मोठाले प्रोजेक्ट टाकतो. त्याचा फायदा बिल्डरला होतो. मंत्र्यांना टक्केवारी मिळते. त्यात साटेलोटे करणाऱ्या अधिकाऱ्यांना फायदा होतो, असे सांगून इनस्पिरा नावाच्या कंपनींने एमआयडीसीकडून किरकोळ भावात घेतलेल्या जमीनचे कसे प्लाॅटिंग झाल्याचा खळबळजनक दावा इम्तियाज जलील यांनी केला.

70 रुपयांची जमीन 1200 रुपयांना विक्री

'या कंपनीने एसीझेड आणणार, असे सांगून जमीन किरकोळ भावात घेतली. मग या कंपनीच्या बोर्डात ठराव केला की, एसीझेड रद्द करून त्यावर प्लाॅटिंग करणार आहे, असे जाहीर केले. सरकारकडून एका उद्दिष्टाने घेतलेली जमीन, पण ते पूर्ण करता येत नसेल, तर ती लँड परत घेतली पाहिजे होती. पण तसे झाले नाही. ही जमीन संबंधित कंपनीने 70 रुपयांनी घेतली, आता संबंधित कंपनी जमीन 1200 रुपये चौरसफूटांना विकत आहे. मी बोलतो ते खरं बोलतो आहे. त्यामुळेच माझ्याविरोधात अ‍ॅक्शन होत नाही', असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.

मंत्री शिरसाटांविरोधातील ताजं प्रकरण

इम्तियाज जलील यांनी गेल्या काही दिवसांपासून मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड, व्हिट्स हॉटेलचे प्रकरण आणि त्यानंतर आता शहरासह लगतच्या भागात सरकारी जमीन, प्लॉट बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचे आरोप करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली. या भूखंड खरेदीचे सर्व पुरावे घेऊन इम्तियाज जलील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com