Imtiaz Jaleel sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel : 'हमारे मुँह में भी जबान है, जब खुलेंगीं तो..' ; इम्तियाज जलील यांनी दिला इशारा!

Imtiaz Jaleel warns : कायदा सर्वांसाठी समान आहे, तुम्हाला जो आहे तोच आम्हालाही लागू आहे. मग आमच्यावरच अन्याय का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Datta Deshmukh

Imtiaz Jaleel Politics : 'देश संविधानानुसारच चालेल, तुमच्या गुंडगिरीवर आणि दादागिरीवर कदापी चालणार नाही. समाजातून कोणी पुढे येणार नाही, लढणार नाही हा तुमचा गैरसमज आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. तुम्ही आमच्या कोणाविषयीही बोला, नुकसान करा तर आम्ही सहन करू. मात्र आमच्या धर्माकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा.', असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

'ज्यांनी मानवतेचा संदेश दिला अशा नबी हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांच्याविषयी अवमान कधीच सहन करणार नाही. असे स्पष्ट करत तुम्ही तोंडात येईल ते बोलत आहात, मात्र याद राखा आम्हीही मुके, बहिरे नाहीत. हमारे मुँह में भी जबान है, जब खुलेंगीं तो तुम्हारे लिए बहोत नुकसान देह साबीत होंगी.' असेही यावेळी जलील(Imtiaz Jaleel) यांनी बजावले.

मुंबईत पुढच्या सोमवारी होणार्‍या तिरंगा रॅलीच्या नियोजनाबाबत आज इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत नियोजन सभा झाली. ही रॅली एखाद्या पक्षाच्या, संघटनेच्या बॅनरखाली नाही, तर ही रॅली समाजासाठी आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक मुसलमान म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन जलील यांनी केले.

कायदा सर्वांसाठी समान आहे, तुम्हाला जो आहे तोच आम्हालाही लागू आहे. मग आमच्यावरच अन्याय का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि म्हटले की, रॅलीला परवानगी मिळेल न मिळेल याचा विचार करणारे आम्ही नाहीत. आज आम्ही समाजासाठी एकत्र येत आहोत. रामगिरी महाराजाला काय झेड प्लस सुरक्षा द्यायची ती द्या, पण उद्या त्याचाही वापर तुम्ही राजकारणासाठी कराल.

याचबरोबर जलील म्हणाले, जितने लोग आयेंगे उतना बडा पैगाम सरकार के पास पहूंचने वाला है. अपनी जमातों को भुल जाओं एक आवाज बनकर खडे रहिए, मेरे भाई एक बडे मुश्किल दौर से हम गुजर रहें हें. यकीन मानिए अगर इसबार आवाज नही उठाईं तो मुश्किल होगा.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT