MIM-Shivsena Meeting : गुप्त बैठक कशासाठी..? उघडपणे युती करा; जलील-शिवसेना नेत्याच्या बैठकीवर शिरसाटांचा हल्ला

Sanjay Shirsat : इम्तियाज जलील यांना कोण काय खातो, हे पाहायची गरज नाही. तुम्ही कुठे गुडघे टेकवता, हे सांगितल्यावर अवघड होईल, असा टोलाही शिरसाट यांनी जलील यांना हाणला.
Imtiaz Jalil-Uddhav Thackeray Sanjay Shirsat
Imtiaz Jalil-Uddhav Thackeray Sanjay Shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 12 September : शिवसेना नेत्यासोबत झालेल्या बैठकीबाबत इम्तियाज जलील यांनी पडदा ठेवण्याचे कारण नाही. गुप्त बैठक कशासाठी? युती करायची असेल, तर उघडपणे यावे. ही बैठक फक्त मुस्लिमांना खेळवत ठेवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरे हे एमआयएमसोबत गेम करत आहेत, असा आरोपही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला.

इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीवर आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना आणि एमआयएममध्ये लोकसभा निवडणुकीत दलाली झाली होती; म्हणून त्यांनी लोकसभेला जास्त जागा लढवल्या नाहीत.

कोण काय खातो, हे इम्तियाज जलील यांना पाहायची गरज नाही. तुम्ही कुठे गुडघे टेकवता, हे सांगितल्यावर अवघड होईल, असा टोलाही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जलील यांना हाणला.

मुस्लीम समाजाने मोर्चा काढावा. तो त्यांचा अधिकार आहे. ते काय करायचं ते करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही कोणाच्या धर्मावर बोलू नये, म्हणजे तुमच्या धर्मावर कोणी बोलणार नाही. तुम्ही एखाद्याला टार्गेट करायचा, प्रयत्न केला तर त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल, असा इशारा संजय शिरसाट यांनी केला.

Imtiaz Jalil-Uddhav Thackeray Sanjay Shirsat
Maharashtra Politics : फडणवीसांच्या गैरहजेरीत अजितदादा अन्‌ एकनाथ शिंदेंची राजकीय चर्चा, शिवसेना नेत्याचा दुजोरा

ते म्हणाले, मुस्लीम समाजाच्या मोर्चातून इम्तियाज जलील यांना विधानसभा निवडणुकीची रणनीती आखायची आहे. त्यांना कुठल्या जाती धर्माशी देणंघेणं नाही. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाज एमआयएमपासून दूर झाला होता, त्यांना तो पुन्हा पक्षाकडे आणायचा आहे.

लोकसभा निवडणुकीत आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळ करेल, असं एमआयएमला वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी उमेदवार दिले नव्हते. मुस्लीम समाजानेही महाविकास आघाडीला साथ दिली हेाती. ते मतदान पुन्हा एमआयएमला जवळ करायचं आहे, त्यासाठीच जलील हे मोर्चा काढत आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.

Imtiaz Jalil-Uddhav Thackeray Sanjay Shirsat
Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी अखेर आंदोलनाचे हत्यार उपसलेच...

आम्ही काहीअंशी यशस्वी ठरलो

आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यात आम्ही काहीअंशी यशस्वीही झालो आहोत. आगामी काळात आणखी प्रयत्न करून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यात येईल, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com