Imtiaz Jalil-Chandrakant Khaire
Imtiaz Jalil-Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : कदाचित खैरेंनीच ते पैसे आम्हाला आणून दिले असतील ; त्यांचे आरोप एन्जाॅय करतो..

जगदीश पानसरे

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव अजून विसरु शकलेले नाहीत. त्यामुळे ते अधूनमधून असे आरोप करत असतात. (Aurangabad) एमआयएमने भाजपकडून १ हजार कोटी रुपये घेतल्याचा नवा आरोप त्यांनी केल्याचे मी ऐकले. कदाचित त्यांना एक हजार नाही तर दहा हजार कोटी म्हणायचे असतील.

एमआयएमला कदाचित खैरे यांनीच पैसे आणून दिले असतील. तसा पुरावा त्यांच्याकडे असेल म्हणून ते बोलत आहेत का? आम्ही त्यांच्या आरोपांना आता एन्जाॅय करतो, अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी खैरेंच्या आरोपाची खिल्ली उडवली. खैरे (Chandrakant Khaire) यांच्या आरोपांवर हसावे की रडावे तेच कळत नाही? लोकसभा निवडणुक शिवसेना-भाजप एकत्र लढले आणि तरी हे आमच्यावर आरोप करत आहेत, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जालना येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर गंभीर आरोप केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमला भाजपने प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर आक्रमक झालेल्या वंचितच्या नेत्यांनी चंद्रकांत खैरे यांना न्यायालात खेचण्याचा इशारा दिला.

एमआयएमने मात्र खैरेंच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. खासदार इम्तियाज जलील `सरकारनामा`शी बोलतांना म्हणाले, खैरेंनी एक हजार कोटींच्या पुढे आणखी दोन शून्य लावायला हवे होते. कदाचित त्यांना दहा हजार कोटी म्हणायचे असेल.

कदाचित भाजपने दिलेले एक हजार कोटी चंद्रकांत खैरे यांनी स्वतः मला आणून दिले असतील म्हणून ते असा आरोप करत आहेत. बरं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खैरेंचा पक्ष आणि भाजप एकत्रित लढले होते, तरी त्यांचा हा आरोप हास्यास्पद वाटतो.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव खैरे साहेब अजूनही पचवू शकलेले नाही हेच त्यांच्या आरोपांवरून दिसून येते. यावर काय प्रतिक्रिया द्यावी, आम्ही तर त्यांचे आरोप आता एन्जाॅय करतो, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला.

जालना येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खैरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह एमआयएमवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक १ हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता.

औरंगाबादला झालेल्या संयुक्त सभे दरम्यान भाजपचा एक पदाधिकारी तिथे उपस्थितीत होता. त्यामुळेच माझा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि एमआयएम निवडून आली. एमआयएम भाजपची बी तर वंचित आघाडी सी टीम असल्याची टीका देखील खैरे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT