औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जालना येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलतांना वंचित बहुजन आघाडी व एमआयएमवर गंभीर आरोप केले होते. (Shivsena) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमला भाजपने प्रत्येकी १ हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप खैरेंनी (Chandrakant Khiare) केला होता. यावर वंचितचे नेते आक्रमक झाले असून प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी खैरेंना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.
असाच आरोप यापुर्वी शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केला होता. त्यानंतर संपुर्ण राज्यातील वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) पदाधिकारी, कार्यकर्ते बांगर यांच्यावर तुटून पडले होते. त्यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा देखील देण्यात आला होता. अखेर बांगर यांनी दिलगीरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकला होता. आता पुन्हा शिवसेनेकडून वंचितवर आरोप झाल्याने खैरे आता तयार रहा, अशा शब्दात वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना इशारा दिला आहे.
अहमद म्हणाले, खैरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या सारख्या नेत्याने असे बिनबुडाचे, खोटे आरोप करू नयेत. राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता आहे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. राज्यातल्या सगळ्या तपास यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. मग पैसे घेतल्याचा पुरावा त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो या तपास यंत्रणेला किंवा आपल्या सरकारकडे देऊन चौकशी करावी.
बोलण्याचे स्वातंत्र असले तरी खोटे, बिनबुडाचे आरोप करू नयेत. वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणाऱ्यांनी आता तयार रहावे.
खोट्या आणि बिनबुडाच्या आरोपावर वंचित खैरेंविरुद्ध न्यायालयात जाणार असल्याचेही अहमद यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अहमद यांनी हा इशारा दिला आहे. जालना येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खैरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसह एमआयएमवर देखील आरोप केला.
खैरे म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपने एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक १ हजार कोटी रुपये दिले होते. औरंगाबादला झालेल्या संयुक्त सभे दरम्यान भाजपचा एक पदाधिकारी तिथे उपस्थितीत होता. त्यामुळेच माझा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि एमआयएम निवडून आली. एमआयएम भाजपची बी तर वंचित आघाडी सी टीम असल्याची टीका देखील खैरे यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.