Mp Imtaiz Jalil News, Aurangabad News, Mp Imtaiz Jalil opinion on Wine sale
Mp Imtaiz Jalil News, Aurangabad News, Mp Imtaiz Jalil opinion on Wine sale Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : वाईन विक्रीवर आमचे मत सोपे ; तुम्ही विक्री करा, आम्ही दुकान तोडतो..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील माॅल, किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता. (Aimim) यावर सरकारवर टीकेची झोड देखील उठली होती, विशेषतः विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करायला निघाले आहे का? असा सवाल केला होता. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtaiz Jalil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून किराणा दुकान, माॅलमध्ये वाईन विक्री केली तर आम्ही दुकाने फोडू, असा आक्रमक पावित्रा घेतला होता. (Aurangabad)

सरकारने मात्र विरोधाला न जुमानता आपला निर्णय पुढे रेटत वाईन विक्री संदर्भातील अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. यामध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबद्दल सर्वसामान्यांची मते मागवण्यात आली आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी याच अधिसूचनेच्या जाहीरातीचा हवाला देत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. (Mp Imtaiz Jalil News)

इम्तियाज जलील यांनी या संदर्भात एक पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर टाकली आहे. यात ते म्हणतात, `ही अधिसूचना लोकांना किराणा स्टोअरमध्ये वाइनच्या विक्रीबद्दल त्यांचे मत देण्यास सांगते. माझे मत सोपे आहे, तुम्ही विक्री करा, आम्ही दुकान तोडतो`. अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी सरकारला टोला लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील महिलांनी उघडपणे समोर यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. एकंदरित वाईन विक्रीवर ठाम असलेल्या महाविकास आघाडी सरकारशी एमआयएम दोन हात करण्याच्या तयारीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT