Chandrakant Khaire, Sandipan Bhumre, Imtiyaz Jaleel Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad Loksabha Exit Poll : खैरेंच्या विजयाचा अंदाज भुमरे, इम्तियाज यांच्या पचनी पडेना; पोल नाकारत म्हणाले...

Lok Sabha Election 2024 : महायुती-महाविकास आघाडी-एमआयएम-वंचित अशा चार प्रमुख पक्षांकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण खऱ्या अर्थाने खैरे-भुमरे-इम्तियाज जलील यांच्यात येथे तिरंगी लढत झाल्याचे पहायला मिळाले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलने अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. तर हे पोल ज्यांच्या विरोधात गेले आहेत, त्यांची मात्र झोप उडाल्याचे चित्र आहे.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारंसघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे आघाडीवर असल्याचा अंदाज जवळपास सगळ्याच संस्थांनी वर्तवला. यावर आक्षेप घेत महायुतीचे संदीपान भुमरे, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी टीका केली. या दोघांनी एक्झिट पोल नाकारात विजयाचे दावे केले.

संदीपान भुमरे Sandipan Bhumre यांनी कसला एक्झिट पोल, मीच निवडून येणार असा दावा केला. तर इम्तियाज जलील यांनी खैरेंच्या विजयाचा अंदाज फोल ठरवत आपण दोनशे टक्के निवडून येणार, असल्याचे म्हटले आहे. अर्थात या एक्झिट पोलमध्ये खैरे यांच्याऐवजी भुमरे किंवा इम्तियाज यांचे नाव असते तर त्यांची भूमिका नेमकी काय असती? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

संभाजीनगर मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान झाले, 2019 च्या तुलनेत मतदारांची संख्या लाखाने वाढली असली तरी मतांचा टक्का मात्र गेल्यावेळी होता तितकाच म्हणजे 63 टक्के एवढा राहिला. महायुती-महाविकास आघाडी-एमआयएम-वंचित अशा चार प्रमुख पक्षांकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण खऱ्या अर्थाने खैरे-भुमरे-इम्तियाज जलील यांच्यात येथे तिरंगी लढत झाल्याचे पहायला मिळाले.

मतदानानंतर सगळ्याच पक्षांनी आकडेमोड केली खरी, पण निवडून कोण येणार? हे ठामपणे कोणीही सांगत नव्हते. उमेदवारांनी विजयाचा दावा करणे यात नवल नाही. परंतु प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या बुथप्रमुख, केंद्र प्रमुख, मतदारांना घराबाहेर काढणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाच खरी परिस्थिती माहीत असते. गेल्या निवडणुकीत जसा कोण निवडून येणार? याचा अंदाज लागत नव्हता, तशीच काहीशी परिस्थिती यावेळी पहायला मिळत आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानंतर ठाकरे गटाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. तर महायुती आणि एमआयएमकडून नव्याने आकडेमोड केली जात आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला दोन दिवस म्हणजेच 48 तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलमधून काहींना दिलासा मिळाला आहे, तर काहींचे टेन्शन वाढले आहे. यावर चार जूनची वाट पाहणे एवढेच त्यांच्या हातात आहे. दरम्यान, खैरे-भुमरे-इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel यांच्या समर्थक, आप्तेष्ठांकडून त्यांच्या विजयासाठी पुजाअर्चा, जप-यज्ञ-अुष्ठाण तसेच दुआ मागितली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT