Manoj Jarange Patil : 'एक्झिट पोल'मध्ये महायुतीला मोठा फटका; जरांगे पाटलांनी 'या' दोन शब्दांतच विषय संपवला

Maharashtra Reservation : प्रचारासाठी राज्यात येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणावर चकार शब्द काढला नाही. तसेच सरकारने समाजाची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महायुतीला 2019 पेक्षा जागा कमी होत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी महायुतीला फटका बसत आहे. तर विरोधातील महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मात्र ही कर्माची फळे असल्याचा म्हणत सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.

मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 तर अपक्ष एका जागेवर दिसत आहे. यामध्ये भाजप 18, शिवसेना शिंदे गट 4, तर अजित पवार गट शून्य, तर मविआतील काँग्रेस 5, ठाकरे गट 14, तर शरद पवार गटास 6 जागा दिसत आहे. प्रचारासाठी राज्यात येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi मराठा आरक्षणावर चकार शब्द काढला नाही. तसेच सरकारने समाजाची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे महायुतीला 2019 पेक्षा जागा कमी होत आहे, असे बोलले जात आहे.

यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil म्हणाले, हे कर्माची फळे आहेत. हा नियतीचा खेळ आहे. निसर्गाचा नियम आहे. किती दिवस गोरगरीबांनी सहन करायचे. धनगर बांधवांना मराठ्यांप्रमाणेच फसवले आहे. बारा बलुतेदारांबाबत हेच सुरू आहे. बंजारा बांधवांचीही हीच फजिती केली आहे. शेवटी लोकांनी अन्यायाला वाचा फोडावी लागते. त्यानुसार त्यांनी लोकशाही रुपी मतदानातून सरकारला जागा दाखवून दिली.

Manoj Jarange Patil
MVA Exit Poll : लोकसभेत पश्चिम महाराष्ट्राचा महाविकास आघाडीला 'हात'; शरद पवारांना साथ?

चार जूनपासून पुन्हा आंदोलन

लोकसभेचा निकालापर्यंत राज्यात आचारसंहिता आहे. त्यानंतर मात्र पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला. ते म्हणाले, गोड बालून सत्ता घ्यायची आणि त्याच जनतेवर अन्याय करायचा. पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हटत नाही. आम्हाला कुणाच्याही विजयात आनंद नाही. कोण निवडून आला काय आणि पडला काय, याचे आम्हाला काही देणे घेणे नाही. आम्हाला आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे. त्यामुळे कुणी मराठ्यांनी कुणाच्याही विजयात सहभागी होऊ नये, असेही आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Manoj Jarange Patil
A Y Patil Meet Sharad Pawar : ए. वाय. पाटील बॅक टू पॅव्हेलियन, शरद पवारांशी पुन्हा जुळलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com