Kailas Patil  Srakarnama
मराठवाडा

MLA Kailas Patil News : ठाकरेंच्या एकनिष्ठ आमदाराला घेरण्याचा सावंत यांचा डाव, पण..

In Dharashiv, the politics of explosion, both Shiv Sena are preparing to run away office bearers : हा पक्ष प्रवेश झालाच तर शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्तेही विविध पक्षात परतीचा प्रवास करण्यासाठी तुमचं ठरलं, तर आमचही ठरलं, अशा पावित्र्यात आहेत. तशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केल्या जात आहेत.

Jagdish Pansare

दिलीप गंभिरे

Dharashiv-Kalamb Shivsena Political News : विधासभा निवडणुकीसाठी आता डावपेच आखण्याला वेग आला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत दणदणीत विजय मिळवला. खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पण विधानसभा निवडणुकीपुर्वी ठाकरे गटाला धक्का देत एकनिष्ठ आमदार कैलास पाटील यांना घेरण्याचा डाव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सांवत यांनी टाकला आहे.

येत्या 14 सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यात ठाकरे गटातील अनेक स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचा शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश निश्चित झाला आहे. कळंब बाजार समितीचे सभापती शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून 14 सप्टेंबर रोजी परांडा येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

हा पक्ष प्रवेश झालाच तर शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्तेही विविध पक्षात परतीचा प्रवास करण्यासाठी तुमचं ठरलं, तर आमचही ठरलं, अशा पावित्र्यात आहेत. तशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचा गड असलेल्या कळंब शहरात पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मोठी खेळी केली आहे. ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेव, माजी उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

पालकमंत्री सावंत (Tanaji Sawant) यांच्या या खेळीने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक मात्तबर नेते, कार्यकर्तेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तसेच अजित पवार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याची तयारी करत आहेत. ठाकरे गटाला दणका देण्याच्या खेळीत सावंत किती यशस्वी होतात? हे लवकरच स्पष्ट होईल. पण त्यांच्या या खेळीचा फटका त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत येताच, शिंदेचे काही पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.

हे सोडणार साथ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवाजी कापसे, त्यांचे समर्थक अजित गुरव, जिलानी कुरेशी, विजय पारवे, राजाभाऊ टोपे, नामदेव पौळ, सतीश टोणगे, शिवाजी कदम, विशाल वाघमारे, सुरेश इंगळे, जयसिंग चौधरी, विठ्ठल समुद्रे, राजाभाऊ गरड, तात्या माने, बाबुराव गिरी, कैलास खोपकर, भगवान खैरमोडे, अनिल पवार, सचिन शिंनगारे, सुनील पवार, शंकर खंडागळे, वैभव सुरेश शेळके हे राजीनामा देणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT