Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला गालबोट;फडणवीसांसमोरच तरुणांवर लाठीचार्ज

Marathwada Muktisangram Din| मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे

सरकारनामा ब्युरो

नांदेड : मराठवाड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचे वातावरण आहे. पण या उत्साहाला गोलबोट लागल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड येथे झेंडावंदनासाठी गेले होते. पण त्याचवेळी कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी फडणवीस यांच्यासमोरच पोलीस भरतीसाठी घोषणाबाजी केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काहीवेळ चांगलाच गोंधळ उडाला होता.

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यात तरुणांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्याच्या हातून हा प्रकल्प निसटल्याने लाखो तरुणांची नोकरीची संधी हिरावली गेली. यामुळे तरुण चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच भर पडली ती पोलीस भरतीची.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये झेंडावंदन कार्यक्रमाला पोहचले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केलं. पण या कार्यक्रमानंतर अचानक काही तरुणांनी फडणवीसांच्या विरोधात आणि पोलीस भरतीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरु केली. तरुणांनी अचानक सुरु केलेल्या घोषणाबाजीमुळे इथे काही वेळ चांगलाच गोंधळ उडाला होती. फडणवीसांनी तरुणांंशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण तरुण त्यांचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

'गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरती रखडली आहे. त्यामुळे अनेक पात्र तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने तात्काळ पोलीस भरती करावी, अशी मागणी या तरुणांकडून करण्यात आली आहे. पण आता राज्य सरकार या पोलीस भरतीबाबत काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT