Income Tax
Income Tax  Sarkarnama
मराठवाडा

जालन्यातील चार स्टील कंपन्यावर प्राप्तिकर विभागाकडून छापे

सरकारना ब्यूरो

मुंबई : जालन्यातील (Jalna) चार स्टील कंपन्यांवर सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोंदी असल्याचा ठपका ठेवत, प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Raids) छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहे.

या कपंन्यांनी स्टील भंगार आणि उत्पादन नोंदीमध्ये घोळ घालून काही बनावट कंपन्यांच्या नावाने कोट्यवधीचे व्यवहार केले. यामुळे जालना, औरंगाबाद, पुणे येथे ३२ ठिकाणी सोमवारी छापे टाकण्यात आले. स्टील रोलिंग कारखान्यांच्या संबंधित विविध शहरांमधील ठिकाणांवर छापे घातले असून सुमारे तीन कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात सुमारे तीनशे कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अंदाज आहे.

यासंदर्भात मागील गुरुवारपासून हे छापेसत्र सुरू झाल्याची माहिती केंद्रीय अर्थखात्याने दिली. या सर्व कंपन्या स्टीलचे टीएमटी बार आणि तुकडे बनवतात. जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकाता याठिकाणी ही कारवाई केली गेली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे मिळाले आहेत. यातील अनेक व्यवहारांची कुठल्याही अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही. या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेयर प्रीमियमच्या माध्यमातून बेहिशेबी रकमेचा व्यवहार केल्याचे आढळले आहे. या गैरव्यवहारात सुमारे २०० कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी आढळली असून, हिशोब नसलेला मोठा मालही कारखाना परिसरात सापडला आहे.

हेही वाचा : किरीट सोमय्यांचे आता मिशन जरंडेश्वर कारखाना..

सातारा : जरंडेश्वर कारखाना कवडीमोल भावाने विकण्यात आला आहे. आता या कारखान्याच्या शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या पाच ऑक्टोबरला मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार असल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT