Ajit Pawar-Sandip Kshirsagar-Bajrang Sonawane News Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonawane-Sandip Kshirsagar : खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांची अजित पवारांशी जवळीक वाढली!

MP Bajrang Sonawane and MLA Sandeep Kshirsagar are seen growing closer to Deputy Chief Minister Ajit Pawar, indicating potential political developments in Maharashtra. : अजित पवार यांनी नुकताच बीड दौरा केला. या दौऱ्यात अंबाजागोई येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची वेळ मागून घेत भेट घेतली.

Jagdish Pansare

Beed Political News : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दुसरे नेते व सध्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मोठ्या साहेबांचीच साथ दिली. निष्ठेचे बक्षीस म्हणून या दोघांना पक्षाने अनुक्रमे विधानसभा, लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. गेल्या दीड वर्षापासून या खासदार-आमदार जोडीने सत्ताधारी राष्ट्रवादी व महायुतीतील भाजपाला कडाडून विरोधही केला.

पण गेल्या पाच-सहा महिन्यात विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण बदलले आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावे लागले, तर जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले. शिवाय राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू झाल्या. विरोधी पक्षाचे खासदार, आमदार असले तरी जिल्हा आणि मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सोनवणे, क्षीरसागर यांना पालकमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घ्यावे लागत आहे.

अजित पवार यांनी नुकताच बीड दौरा केला. या दौऱ्यात अंबाजागोई येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांची वेळ मागून घेत भेट घेतली. पालकमंत्र्यांनीही ती दिली आणि सोनवणे यांचे म्हणणे ऐकून घेतले. (Bajrang Sonawane) तर इकडे आमदार संदीप क्षीरसागर सध्या शहराचा पाणीपुरवठा आणि रस्ते, वीज या प्रश्नामुळे अडचणीत सापडले आहे. लोकांचा वाढता रोष पाहता हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनाही वारंवार अजित पवारांची जिल्हा दौऱ्यात आणि मुंबईत जाऊन भेट घ्यावी लागली.

अजित पवारांनीही पक्षभेद विसरून त्यांची अनेक कामे मार्गी लावली. त्यामुळे (Sandip Kshirsagar) संदीप क्षीरसागर यांनीही बीड दौऱ्यात अजित पवारांचे आभार मानणारे बॅनर जागेजागी लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या या खासदार, आमदारांची अजित पवारांशी वाढती जवळीकता ही त्यांची अपरिहार्यता आहे, की मग भविष्यातील वेगळ्या निर्णयाची नांदी? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

खासदार बजरंग सोनवणे हे एकेकाळी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही विश्वासू म्हणून ओळखले जायचे. पण त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात एंट्री केली. सोनवणे जाईंट किलर ठरले संसदेत पोचले. विधानसभा निवडणुकीत आघाडीसाठी सर्वत्र उलटे वारे वाहत असताना संदीप क्षीरसागरांनी बीडमध्ये आपली नौका पैलतीरी नेलीच. परंतु, आता राजकीय विरोधाभासाचे वातावरण आहे.

पालकमंत्रीपद पवारांकडे आणि सोनवणे, क्षीरसागर विरोधी पक्षात. त्यामुळे आता या दोघांना पवारांचे पालकत्व स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. मागच्या काही काळात तसे चित्रही दिसत आहे. शरद पवार यांचे विश्वासू अशी संदीप क्षीरसागर यांची ओळख आहे. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथेवेळीही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. मागच्या काळातही पक्ष सत्तेत गेल्यानंतरही ते थोरल्या पवारांसोबतच थांबले. आता बीडच्या प्रश्नांसाठी त्यांना अजित पवारांचाच आधार घ्यावा लागत आहे.

बजरंग सोनवणेंकडूनही पवारांच्या दौऱ्यात अधिक जवळ जाण्याचे प्रयत्न दिसून आले. अंबाजोगाईतील बैठकीला हजेरीनंतर नियोजन समिती बैठकीनंतर काही विकास कामांच्या निमित्ताने पवारांच्या सुचनेवरुन त्यांचे खासगी सचिव डॉ. राजेश देशमुख यांनी सोनवणेंना वेळ दिला. सोनवणेंना कारखान्यांसाठी राज्य सरकार आणि आपल्या समर्थकांचा हात चालता ठेवण्यासाठी विकास निधी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही बोलण्यात 'दादा' शब्द वाढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT