Sudhir Mungantiwar 2 Sarkarnama
मराठवाडा

Chandrapur BJP leadership : मुख्यमंत्र्यांच्या काकू, माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना अभिप्राय का नोंदवता आला नाही?

Infighting in Chandrapur BJP Over District President Post Sudhir Mungantiwar Supporter Opposed : भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष होऊ नये, यासाठी सर्व आजी-माजी आमदार एकत्र आले आहेत.

Rajesh Charpe

Chandrapur political news : चंद्रपूर जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष होऊ नये, यासाठी सर्व आजी-माजी आमदार एकत्र आले आहेत. याकरिता अभिप्राय नोंदवून घेण्यात आले.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू व माजी मंत्री शोभा फडणवीस यांना अभिप्राय नोंदवण्यास नकार देण्यात आला, तर दुसरीकडे चंद्रपूरचे माजी आमदार नाना श्यामुकळे यांनी अभिप्राय नोंदवण्यासाठी तब्बल सात वर्षानंतर नागपूरमधून बोलावून घेतले होते. यावरून चंद्रपूर भाजपमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले असल्याचे स्पष्ट होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. आता त्यांचे जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येते. मुनगंटीवर यांच्नी टोकाचा विरोध केल्यानंतरही माजी आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसुद्धा देण्यात आली. जोरगेवारांनी भाजपचा विश्वास सार्थ ठरवला. मोठ्या मतांच्या फरकांनी ते निवडून आले.

जोरगेवारांना पक्षात घेण्याचा निर्णय प्रदेश भाजपने (BJP) घेतला होता. त्यांना तिकीट मिळू नये याकरिता ऐन निवडणुकीच्या धामधुमित मुनगंटीवर दिल्लीला गेले आणि अमित शहा यांची भेट घेतली. मात्र कोणीच्या त्यांच्या विरोधाची दखल घेतली नाही. या उलट अमित शहा यांनी मुनगंटीवार यांना टाळून जोरगेवार यांना प्रचारसभा दिली. या सर्व घडामोडींमुळे वादाची ठिणगी पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूरच्या दौऱ्यात मुनगंटीवार नव्हते. दुसरीकडे त्यांच्या गाडीत जोरगेवार यांना स्थान देण्यात आले होते.

भाजपच्या स्थापना दिनाचेही आमदार जोरगेवार आणि मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले. शोभाताई फडणवीस यांनी जोरगेवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. चंद्रपूर जिल्ह्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांचेसुद्धा मुनगंटीवार यांच्याशी कधीच पटले नाही. आता बंटी भांगडिया हेसुद्धा मुनगंटीवारांच्या विरोधकांच्या खेम्यात जाऊन बसले आहेत. मुनगंटीवारांचे समर्थकांनाही पक्षांतर्गत गटबाजीची झळ आता बसायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या समर्थक असलेले जिल्हा व शहराध्यक्षांना बदलण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अभिप्राय नोंदवून घेण्यात आली. यासाठी अधिकाधिक संख्येने भाजपचे पदाधिकारी आले होते.

मात्र दहा वर्षांपासून भाजपात सक्रिय नसल्याने शोभाताई फडणवीस यांना आपला अभिप्राय नोंदवता आला नाही. शोभाताई 1995मध्ये भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. त्यानंतर सहा वर्षे विधान परिषद सदस्य होत्या. विधान परिषदेच्या कार्यकाळ संपल्यानंतर शोभाताईंनी सक्रिय राजकारणातून अंग काढून घेतले होते. नाना श्यामकुळे चंद्रपूरचे दोन वेळा आमदार होते. ते मूळचे नागपूरचे आहेत. 2019च्या निवडणुकीत जोरगेवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर श्यामकुळे नागपूरला परतले. त्यानंतर तब्बल सहा वर्षानंतर ते अभिप्राय नोंदवण्यासाठीच ते चंद्रपूरला गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT