Radhakrishna Vikhe Patil : सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अडचणीत आलेल्या विखे पाटलांचं टेन्शन ठाकरे गटाने आणखी वाढवलं; CM फडणवीसांकडे केली 'ही' मोठी मागणी

Radhakrishna Vikhe Patil : भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून शेतकऱ्यांच्या नावे काढलेल्या बेसल डोस कर्जाचं प्रकरण समोर उघडकीस आलं आहे.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 30 Apr : भाजप नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून शेतकऱ्यांच्या नावे काढलेल्या बेसल डोस कर्जाचं प्रकरण समोर उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणांवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. 'सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या संस्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्या म्हणतात, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे 'कॉमन मॅन' आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे 'डेडिकेटेड कॉमन मॅन' अशा वल्गना करणारे सरकार सामान्यांच्या तोंडाचा घास कसा हिरावू शकतं याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil fraud case : मोठी बातमी; भाजप मंत्री विखेंसह 54 जणांविरोधात '420'चा गुन्हा

महायुती सरकारमधील पूर्वीचे मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे संस्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य दहा हजार शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेले राष्ट्रीयकृत बँकांमधील पैसे त्यांच्या खात्यावर पडू दिले नाहीत आणि ते स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

एवढा मोठा संस्था चालक संस्थानी आणि धनी असणाऱ्या व्यक्तीने सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला हे अत्यंत वाईट आहे. महायुती सरकारसाठी ही अत्यंत शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे, असं म्हणत त्यांनी विखेंसह सरकारवर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Radhakrishna Vikhe Patil
Ashok Khemka : भल्या भल्या राजकारण्यांना भिडणाऱ्या अधिकाऱ्याचा 'जलवा' थांबणार; 57 बदल्यांनंतर अखेर अशोक खेमका निवृत्त

तर याच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी विखेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली. त्या म्हणाल्या, "या प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार लोणी पोलिस चौकीमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असलेला नेता महायुती सरकारमध्ये चालतो कसा? असा आमचा सवाल आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घ्यावा."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com