Shivsena Protest Against Inflation Sarkarnama
मराठवाडा

महागाईचा भडका, गॅस सिलेंडर खांद्यावर घेऊन शिवसैनिकांचा मोदी सरकार विरोधात आक्रोश...

अच्छे दिनच्या नावाखाली गेली सात-आठ वर्ष केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेला फसवत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. (Shivsena)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन चार राज्यात भाजपची सत्ता आली. (Shivsena) दरम्यान, युक्रेन-रशियाचे युद्धही भडकले. पण आशाही परिस्थिती केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर वाढू दिले नव्हते. (Aurangabad) परंतु निवडणुकांचे निकाला जाहीर होऊन त्या त्या राज्यांमध्ये सरकारे स्थापन झाली अन् अचानक भडका उडावा तशा पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या. (Marathwada)

पेट्रोल अवघ्या पाच दिवासांत पावणे चार रुपयांनी तर गॅस सिलेंडर तब्बल ५० रुपयांनी महागला. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले, गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आणि महागाईचा चटका सगळ्यांनाच बसू लागला. केंद्रातील मोदी सरकारने ऐन उन्हाळ्यात जनतेला दिलेला हा धक्का पाहता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने महागाईचा निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करत संताप व्यक्त केला. शिवसेनेचे आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उन्हाचा पारा ४० अंशावर असतांना दुपारी क्रांतीचौकात महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

शिवसैनिकांनी खांद्यावर गॅसचा सिलेंडर घेऊन तर महिला आघाडीच्या पदाधिकीरी कार्यकर्त्यांनी चूल पेटवत महागाईचा विरोध केला. आमदार संजय शिरसाट यांची देखील यावेळी प्रमुख उपस्थिती होती. २०१४ मध्ये ४१२ रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता १०२५ रुपयांवर जाऊन पोहचला असल्याचे दर्शवणारे फलक देखील यावेळी शिवसैनिकांनी हातात घेत घोषणाबाजी केली.

अच्छे दिनच्या नावाखाली गेली सात-आठ वर्ष केंद्रातील भाजप सरकार देशातील जनतेला फसवत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्र आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या चांगलाच भडकला आहे. ईडी, सीबीआय सारख्या संस्थांकडून शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरावर पडणाऱ्या धाडीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

अशातच महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतर केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनातील आक्रोश व्यक्त करण्याची मिळालेली संधी शिवसेनेने हेरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी क्रांतीचौकात रखरखत्या उन्हात शकडो शिवसैनिकांनी मोदी सरकारच्या नावाने शंख करत महागाईचा निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT