Pankaja Munde and Dhananjay Munde: Sarkarnama
मराठवाडा

Vaidyanath Sugar Factory : अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडे देणार मदतीचा हात ?

Pankaja Munde and Dhananjay Munde: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे १९ कोटींची जीएसटी रक्कम थकल्याने वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयाकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर नाराजीही व्यक्त केली. आता अडचणीत सापडलेल्या पंकजा मुंडेंना मंत्री धनंजय मुंडे मदतीचा हात देणार असल्याची समोर येत आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्याशी कारखान्याबाबत चर्चा करणार असून, शक्य ती मदत करणार आहेत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे काय ? आणि कशी मदत करतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याकडे १९ कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकल्याने छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी मालमत्ता जप्तीसंदर्भात कारखान्याला नोटीस जारी केली. त्यामुळे सध्या पंकजा मुंडे या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहे, तर याबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करत आपल्या कारखान्याला मदत न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

"आर्थिक अडचणीत असलेल्या इतर कारखान्यांना सरकारने मदत केली, पण मी सोडून बाकी सर्वांना आर्थिक मदत मिळाली. जर मदत मिळाली असती तर असे प्रकार घडले नसते", अशी खंत पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, आता पंकजा मुंडे यांचे भाऊ कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय वैर विसरत बहीण पंकजा मुंडे यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT