BJP MLA On Highway officers: अंडरपासचे पाणी बघून आमदारांनी अभियंत्याला झापले; व्हिडिओ कॉल करत दाखवली थेट परिस्थिती

Political : भाजपच्या आमदारांनी या अंडरपासची दखल घेत थेट महामार्ग अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.
BJP MLA
BJP MLASarkarnama
Published on
Updated on

Akola News: कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या मध्यवर्ती भागात अंडरपास पुलाचे बांधकाम करण्यात आले. पण पावसाळ्यातील तीन महिने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. याबाबत माध्यमांमध्ये अनेकदा वृत्तही झळकले. आता उशिरा का होईना भाजपच्या आमदारांना या अंडरपासची दखल घ्यावीशी वाटली आणि त्यांनी थेट अंडरपासमधील पाण्यापासून महामार्ग अभियंत्यांना थेट व्हिडिओ कॉल करत चांगलेच धारेवर धरले.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बस स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या खाली भाटे क्लब ते टॉवर चौकापर्यंत जाणारी वाहतूक वळवण्याकरिता अंडरपास पुल तयार करण्यात आला. महामार्ग निधीतून तयार करण्यात आलेल्या या महामार्गामुळे नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी त्याची डोकेदुखीच जास्त झाली आहे.

BJP MLA
Vivek Kolhe On Vikhe Patil: 'अडवणं अन् जिरवणं हाच विखे पॅटर्न, पण...'; विवेक कोल्हेंचा विखेंवर निशाणा

कारण पावसाळा सुरु झाल्यापासून अर्धात जवळपास तीन महिन्यांपासून या ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प होत आहे. त्यापूर्वीही येथून पाणी काढण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने हा मार्ग अधूनमधून वाहतुकीसाठी बंद राहतो. आता तर या अंडरपासमुळे भाजपचे लोकप्रतिनिधीच विनोदाचा भाग होऊ लागले आहेत. या अंडरपासला भाजपच्या विकास कामातील 'स्विमिंगपूल' संबोधून भाजपच्या लोकप्रतिनिधींवर टीका करण्यात येत आहे.

अखेर आमदार रणधीर सावरकर यांनी स्वतः थेट अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याजवळ जात महामार्ग अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये वस्तूस्थितीची जाणीव करून दिली. अनेकदा सांगून देखील अधिकारी काम करीत नसल्यामुळे त्यांनी महामार्ग अभियंत्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरून खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांनी हा अंडरपास तयार करून घेतला होता. बस स्थानक चौकातील वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका व्हावी, हा यामागील उद्देश होता. मात्र, या उद्देशालाच हरताळ पासली जात आहे. तक्रारीचे तत्काळ निवारण न केल्यास, जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही आमदार सावरकर यांनी दिला.

Edited By- Ganesh Thombare

BJP MLA
Vikhe Patil On Kolhe-Thorat: 'पाहुणे म्हणून येता, पाहुण्यासारखे राहा, भाडेकरू बनू नका'; विखे पाटलांचा थोरात-कोल्हेंना इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com