Bhatkhalkar-Thackeray-Singh
Bhatkhalkar-Thackeray-Singh Sarkarnama
मराठवाडा

वाझे प्रकरणात परमवीर सिंग यांनी ठाकरे, परबांवर केलेल्या आरोपाची चौकशी करा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : निलंबित सचिन वाझे यांना पोलिस दलात पुन्हा रूजू करून घेण्यासाठी माझ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Cm Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे आणि अॅड.अनिल परब यांचा दबाव होता, असा आरोप पुर्व पोलिस आयुक्त परमवीर सिंग (Atul Bhatkhalkar) यांनी समाजमाध्यमांवर केला आहे. (Bjp) हा प्रकार अत्यंत गंभीर, किळसवाणा आणि महाभकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणणारा आहे.

पुर्व मुख्य सचिव सांगतात आनिल देशमुख मला बदल्यांच्या याद्या द्यायचे, तर पुर्व पोलिस आयुक्त म्हणतात माझ्यावर सचिन वाझेला कामावर घेण्यासाठी मंत्र्यांचा दबाव होता. आमची मागणी आहे, या संपुर्ण आरोपांची चौकशी झाली पाहिजे, असे म्हणत भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी सोशल मिडियावर केलेल्या दाव्याचा दाखला देत भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. भातखळकर म्हणाले, निलंबित सचिन वाझे, शिवसेनेचे पुर्व प्रवक्ते सचिन वाझे यांना पोलिस दलात पुन्हा कामावर घेण्यासाठी आपल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांचा दबाव होता, असा आरोप केला आहे.

हा प्रकार धक्कादायक, किळसवाणा आणि महाभकास आघाडी सरकारचे भ्रष्ट स्वरूप जनतेसमोर आणणारा आहे. माजी मुख्य सचिव अनिल देशमुख मला बदल्यांच्या याद्या द्यायचे, माजी पोलिस आयुक्त म्हणतात माझ्यावर सचिन वाझेच्या नियुक्तीसाठी दबाव होता. त्यामुळे आमची मागणी आहे, की या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.

शंभर कोटींची वसुली करणाऱ्या सचिन वाझे आणि तो काय बिन लादेन आहे का? म्हणत त्याचे समर्थन करणाऱ्यांची देखील या निमित्ताने चौकशी झाली पाहिजे, असेही भातखळकर यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT